Hardik Pandya: हार्दिक पंड्याचा गुलीगत शॉट; Video तुफान व्हायरल

Hardik Pandya No Look Shot: भारताचा स्टार फलंदाज हार्दिक पंड्याने नो लूक शॉट मारला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
Hardik Pandya: हार्दिक पंड्याचा गुलीगत शॉट; Video तुफान व्हायरल
hardik pandyatwitter
Published On

IND vs BAN, Hardik Pandya No Look Shot Video: भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या टी -२० सामन्यात भारतीय संघाने सोपा विजय मिळवला. ग्वालियरच्या मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात भारतीय संघाकडून गोलंदाजीत अर्शदीप सिंग आणि वरुण चक्रवर्ती यांची जादू पाहायला मिळाली.

तर फलंदाजीत हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादवची तुफान फटकेबाजी पाहायला मिळाली. भारतीय संघाने बांगलादेशचा डाव अवघ्या १२७ धावांवर हाणून पाडला. त्यानंतर दुसऱ्या डावात अवघ्या १२ षटकात धावांचा यशस्वी पाठलाग करत विजय मिळवला.

हार्दिकचा हटके शॉट

धावांचा पाठलाग करताना हार्दिक पंड्याने तुफान फटकेबाजी केली. या सामन्यातील १२ व्या षटकात बांगलादेशकडून तस्कीन अहमद गोलंदाजीला आला होता. या षटकात तस्कीनने टाकलेल्या शॉर्ट चेंडूवर हार्दिकने अंगाच्या अगदी जवळून शॉट मारला, जो किपरच्या डोक्यावरुन चार धावांसाठी गेला. शॉट मारल्यानंतर त्याने मागे वळूनही पाहील नाही. या शॉटचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

Hardik Pandya: हार्दिक पंड्याचा गुलीगत शॉट; Video तुफान व्हायरल
IND vs BAN: अर्शदीप सिंगच्या नावे नव्या रेकॉर्डची नोंद; अश्विन, बुमराह आणि नेहरालाही सोडलं मागे

ग्वालियरच्या मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघाकडून अर्शदीप सिंग आणि वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक ३-३ गडी बाद केले. तर वॉशिंग्टन सुंदर , मयांक यादव आणि हार्दिक पंड्याने प्रत्येकी एक गडी बाद केला. या शानदार गोलंदाजीसह बांगलादेशचा डाव अवघ्या १२७ धावांवर आटोपला.

Hardik Pandya: हार्दिक पंड्याचा गुलीगत शॉट; Video तुफान व्हायरल
IND vs BAN: बांगलादेशला धूळ चारताच टीम इंडियाने रचला इतिहास! १७ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं

हार्दिक पंड्याची तुफान फटकेबाजी

भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी १२८ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून सलामीला आलेल्या संजू सॅमसन आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी प्रत्येकी २९-२९ धावांची खेळी केली. तर शेवटी हार्दिकने ३९ धावांची खेळी करत भारतीय संघाला ७ गडी राखून विजय मिळवून दिला. या विजयासह भारतीय संघाने १-० ने आघाडी घेतली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com