India Vs Bangaladesh News : भारताने तिसऱ्या एक दिवसीय मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात २२७ धावांनी पराभव केला आहे. टीम इंडियाच्या विजयामुळे बांग्लादेशकडून संघ 'क्लीन स्वीप' होण्यापासून बचावला आहे. मात्र, टीम इंडियाच्या विजयानंतर बांग्लादेशने २-१ ने मालिका जिंकली आहे. टीम इंडियाच्या ४०९ धावांच्या पाठलाग करण्यासाठी उतरलेली बांग्लादेशचा संपूर्ण संघ १८२ धावांवर गारद झाला. (Latest Marathi News)
एक दिवसीय मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात बांग्लादेशने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या भारताच्या फलंदाजांनी बांग्लादेशच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली.
टीम इंडियाने आठ गडी गमावून ४०९ धावांचा मोठा डोंगर उभा केला. टीम इंडियाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेली बांग्लादेशची संपूर्ण टीम १८२ धावांमध्ये तंबूत परतली. त्यामुळे टीम इंडियाचा (Team India) टीम बांग्लादेशच्या विरोधात २२७ धावांनी मोठा विजय झाला.
बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात ईशान किशननं विस्फोटक फलंदाजी केली. त्यानं बांगलादेशच्या गोलंदाजांच्या अक्षरशः चिंधड्या उडवल्या. त्यानं द्विशतक ठोकलं. ईशाननं फक्त ८५ चेंडूंत आपलं पहिलं शतक ठोकलं. त्यानंतर स्फोटक फलंदाजी करून वेगवान द्विशतक झळकावलं. द्विशतकी खेळीनंतर ईशानवर भारतीयांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
दरम्यान, बांग्लादेश विरुद्धच्या या सामन्यात ईशान किशनच्या वादळी द्विशतकासोबतच विराट कोहलीनेही शानदार शतक झळकावले. विराटचे हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ७२ वे शतक ठरले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.