Umesh Yadav News: महिला दिनाच्या दिवशीच चिमुकलीचे आगमन! टीम इंडियाचा 'हा' स्टार खेळाडू झाला 'बापमाणूस'

Umesh Yadav Blessed With Baby Girl: चोेथ्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघातील खेळाडूला गोड बातमी मिळाली आहे
team india
team indiaTwitter/BCCI
Published On: 

Team India News: भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये सुरु असलेल्या ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अंतिम सामन्याला ९ मार्चपासून सुरुवात होणार आहे.

हा सामना भारतीय संघाला मालिका जिंकण्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघातील खेळाडूला गोड बातमी मिळाली आहे. (Latest sports updates)

team india
IND VS AUS: अंतिम कसोटी सामन्यासाठी टीम इंडियात मोठा बदल,'या' ३ खेळाडूंना रोहित ठेवणार संघाबाहेर

भारतीय संघातील वेगवान गोलंदाज उमेश यादव हा सध्या भारतीय संघासोबत आहे. अहमदाबाद कसोटी सामन्यापूर्वी त्याला एक गोड बातमी मिळाली आहे. उमेश यादव हा दुसऱ्यांदा बापमाणूस झाला आहे.

त्याच्या घरी मुलीचे आगमन झाले आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.

उमेश यादवने ट्विट करत ही गोड बातमी दिली आहे. ही गोड बातमी येताच त्याच्या चाहत्यांनी त्याला शुभेच्छा द्यायला सुरुवात केली आहे.

उमेश यादव आणि तान्या हे दोघेही २०१३ मध्ये विवाह बंधनात अडकले होते. तर २०२१ मध्ये त्यांच्या घरी मुलीचे आगमन झाले होते.

team india
IND VS AUS 4th Test: फलंदाज म्हणून जे गावसकर - अझहरुद्दीनलाही नाही जमलं; ते करत हिटमॅन रचणार इतिहास

काही दिवसांपूर्वीच उमेश यादवच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यानंतर तो तिसरा कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. या कसोटी सामन्यात फिरकी गोलंदाजांना मदत मिळत असताना उमेश यादवने अप्रतीम गोलंदाजी केल्याचे पाहायला मिळाले होते.

त्याने पहिल्या डावात ३ गडी बाद केले होते. आता चौथ्या कसोटी सामन्यातही त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.