IND VS AUS 3rd test: इंदूरच्या मैदानावर भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने जोरदार कामगिरी करत ९ गडी राखून विजय मिळवला आहे. या विजयानंतर भारतीय संघाची चिंता आणखी वाढली आहे.
कारण भारतीय संघाला जर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अँटी फेरीत प्रवेश करायचा असेल तर कुठल्याही परिस्थितीत भारतीय संघाला चौथ्या कसोटीत विजय मिळवाव लागणार आहे. त्यामुळे चौथ्या कसोटीत भारतीय संघात काही महत्वाचे बदल पाहायला मिळू शकतात. (Latest sports updates)
चौथा कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडणार आहे. या सामन्यात भारतीय संघात काही मह्त्वाचे बदल पाहायला मिळू शकतात. या सामन्यात श्रेयस अय्यर, मोहम्मद सिराज आणि केएस भरत यांना विश्रांती दिली जाऊ शकते.
इंदूर कसोटीत मोहम्मद शमीच्या जागी मोहम्मद सिराजला संधी दिली गेली होती. मात्र तो फलंदाजीत आणि गोलंदाजीत खाते देखील उघडू शकला नव्हता. कुठलाही कसोटी सामना खेळताना ही सिराजने केलेली सर्वात निराशाजनक कामगिरी आहे. तर मध्यक्रमात फलंदाजी करणाऱ्या श्रेयस अय्यरकडूनही चांगल्या कामगिरीची होती. मात्र तो या सामन्यात हवी तशी कामगीरी करू शकला नाही. त्यामुळे चौथ्या कसोटी सामन्यात त्याला बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो.
या खेळाडूंना मिळू शकते संधी..
अहमदाबाद कसोटीत ३ खेळाडू संघाबाहेर जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. श्रेयस अय्यर, केएस भरत आणि मोहम्मद सिराज यांना विश्रांती दिली जाऊ शकते. त्यांच्याऐवजी ईशान किशन, सूर्यकुमार यादव आणि मोहम्मद शमीला संधी दिली जाऊ शकते. कारण सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन जोरदार फॉर्ममध्ये आहेत. याचा फायदा भारतीय संघाला होऊ शकतो. तर मोहम्मद शमी हा अनुभवी गोलंदाज आहे. त्यामुळे महत्वाच्या सामन्यात रोहित त्याला संधी देऊ शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.