Pakistan Cricket Team: पाकिस्तान वर्ल्डकपमधून बाहेर पडणार? 'हा संघ' करणार टॉप 10 मध्ये प्रवेश

ICC ODI World Cup 2023: आता पाकिस्तानचे क्रीडामंत्री एहसान माझरी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
india vs pakistan
india vs pakistansaam tv
Published On: 

Pakistan Cricket Team In ICC ODI World Cup 2023: पाकिस्तानचा संघ वर्ल्डकप खेळण्यासाठी भारतात येणार का? हा प्रश्न काही सुटायचं नाव घेत नाही. यावर्षी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेचा थरार भारतात रंगणार आहे.

नियोजित वेळापत्रकानुसार भारत पाकिस्तान सामना १५ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे तर पाकिस्तानचे सामने अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई, कोलकाता आणि हैदराबाद या ५ शहरांमध्ये रंगणार आहे. दरम्यान आता पाकिस्तानचे क्रीडामंत्री एहसान माझरी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

india vs pakistan
IND vs WI 1st Test: पहिल्या कसोटीसाठी संघाची घोषणा! विस्फोटक खेळाडूचं संघात कमबॅक

आयसीसी वनडे वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी आशिया चषक २०२३ स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. मात्र बीसीसीआयने पाकिस्तानमध्ये जाऊन खेळण्यास नकार कळवला होता.

त्यामुळे ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलमध्ये खेळवली जाणार आहे. स्पर्धेतील ४ सामने पाकिस्तानमध्ये तर ९ सामने श्रीलंकेत खेळवले जाणार आहेत.

यावरून निशाणा साधत पाकिस्तानचे क्रीडामंत्री एहसान माझरी यांनी म्हटले की, 'माझं म्हणणं इतकच आहे की, जर भारताला आशिया चषक हायब्रिड मॉडेलमध्ये खेळायचा असेल, तर आम्हालाही वर्ल्ड कप हायब्रिड मॉडेलमध्ये खेळायचा आहे.' (Latest sports updates)

india vs pakistan
Team India Playing 11: पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची प्लेइंग 11; आक्रमक फलंदाजाला राहावं लागेल संघाबाहेर

पाकिस्तानने माघार घेतल्यास कोण खेळणार वर्ल्डकप?

आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेचा थरार ५ ऑक्टोबरपासून रंगणार आहे. या स्पर्धेसाठीचे १० संघ ठरले आहेत. मात्र पाकिस्तानने अजूनही भारतात येण्याचे संकेत दिलेले नाहीत. त्यामुळे पाकिस्तानने भारतात येण्यास नकार दिला तर, पाकिस्तानऐवजी कोणता संघ खेळणार? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.

जर पाकिस्तानने या स्पर्धेतुन माघार घेतली तर आयसीसी वर्ल्ड कप पात्रता फेरीतील सामन्यांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असलेला स्कॉटलॅंडचा संघ वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेच्या टॉप १० मध्ये प्रवेश करेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.