ICC Ranking : न्यूझीलंड कसोटीआधी टीम इंडियाच्या ३ दिग्गज खेळाडूंना मोठा झटका

ICC Test Ranking : भारत - न्यूझीलंड यांच्यात शेवटचा कसोटी सामना १ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. पण त्याआधीच भारतीय संघातील जसप्रीत बुमराह, विराट कोहली आणि रिषभ पंत या तीन दिग्गज खेळाडूंना मोठा झटका बसला आहे. आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये तिघांचे स्थान घसरले आहे.
Team India players
Team India playerssaam tv
Published On

आयसीसीने (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) बुधवारी कसोटी क्रिकेट खेळाडूंची (पुरूष) ताजी रँकिंग प्रसिद्ध केली आहे. भारताचा वेगवान गोलंदाज आणि यॉर्कर किंग अशी ओळख असलेल्या जसप्रीत बुमराहला मोठा झटका बसला आहे. दक्षिण आफ्रिकेचा तेजतर्रार गोलंदाज कगिसो रबाडानं बुमराहला मागे टाकत रँकिंगमध्ये अव्वल स्थान पटकावलं आहे.

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा हा सध्या जबरदस्त फार्मात आहे. अलीकडेच मीरपूरमध्ये बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ९ विकेट घेत त्याने ३०० विकेट घेण्याचा पराक्रम केला होता. याच जोरावर दक्षिण आफ्रिकेने मीरपूरमधील कसोटीत ९ विकेटनं विजय मिळवला होता.

बुमराहचं मोठं नुकसान

जसप्रीत बुमराहने पुण्यात न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात एकही विकेट घेतली नाही. त्याचा थेट परिणाम ताज्या क्रमवारीत दिसून आला. दोन स्थानांनी त्याची घसरण होऊन तो तिसऱ्या स्थानी फेकला गेला आहे. ऑस्ट्रेलियाचा जोश हेजलवुड हा दुसऱ्या स्थानी आहे. तर भारताचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विनच्या क्रमवारीत घसरण होऊन चौथ्या स्थानी पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स हा अव्वल पाच गोलंदाजांमध्ये आहे.

रावळपिंडीमध्ये अलीकडेच इंग्लंडविरुद्ध झालेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात फिरकीची जादू दाखवणारा नोमान अली यानं अव्वल १० जणांच्या यादीत स्थान मिळवलं आहे. भारतविरुद्ध कसोटी मालिका जिंकण्यात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या मिचेल सँटनरने क्रमवारीत ३० स्थानांची झेप घेतली आहे. पुणे कसोटीत १३ विकेट घेणारा हा फिरकीपटू ४४ व्या स्थानी पोहचला आहे.

विराट कोहली आणि रिषभ पंतला फटका

फलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल याला एका स्थानाचा फायदा झाला आहे. तो तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. त्याने पुण्यात न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात पहिल्या आणि दुसऱ्या डावात अनुक्रमे ३० आणि ७७ धावा केल्या होत्या. पण दुसरीकडे स्फोटक फलंदाज रिषभ पंत आणि विराट कोहलीचे क्रमवारीतील स्थान घसरले आहे. तो सध्या ११ व्या स्थानी आहे. तर कोहली १४ व्या स्थानी घसरला आहे.

न्यूझीलंडचा ड्वेन कॉन्व्हे याच्या आयसीसी कसोटी क्रमवारीत ८ स्थानांची सुधारणा होऊन तो २८ व्या स्थानी, तर टॉम लॅथम हा ३४ व्या स्थानी पोहोचला आहे. ग्लेन फिलिप्स ४५ व्या, दक्षिण आफ्रिकेचा काइल वेरिन ३२ व्या स्थानी पोहोचला आहे.

Team India players
IND vs BAN: विराट २७ हजारी, जडेजा ३०० विकेट्स अन् अश्विन नंबर १.. कानपूर कसोटीत मोडले जाणार ११ मोठे रेकॉर्ड्स

जडेजा ऑलराउंडर नंबर १

कसोटीतील अष्टपैलू खेळाडूंच्या ताज्या क्रमवारीत भारताचा रविंद्र जडेजा पहिल्या स्थानी विराजमान आहे. तर आर. अश्विन हा दुसऱ्या स्थानी आहे. दोघांनी क्रमवारीत चांगली प्रगती केली आहे. बांगलादेशचा मेहदी हसन तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने अष्टपैलू कामगिरी केली आहे. त्याचा फायदा त्याला या क्रमवारीत झाला.

Team India players
आर अश्विन ICC bowling रॅंकिंगमध्ये अव्वल स्थानी विराजमान! पाहा कोण आहेत उर्वरित ९ गोलंदाज

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com