Jasprit bumrah
Jasprit bumrah twitter

ICC Test Rankings: जसप्रीत बुमराहने रचला इतिहास! वनडे, टी-20 नंतर कसोटीतही बनला नंबर 1 गोलंदाज

Jasprit Bumrah Test Ranking: आयसीसीच्या गोलंदाजांच्या रँकिंगमध्ये भारतीय गोलंदाजांचा जलवा पाहायला मिळाला आहे. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह कसोटी रँकिंगमध्ये अव्वल स्थानी पोहोचला आहे.
Published on

Jasprit Bumrah Becomes No. 1 Bowler In ICC Test Ranking :

आयसीसीच्या गोलंदाजांच्या रँकिंगमध्ये भारतीय (ICC Test Ranking) गोलंदाजांचा जलवा पाहायला मिळाला आहे. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह कसोटी (Jasprit Bumrah Test Ranking) रँकिंगमध्ये अव्वल स्थानी पोहोचला आहे. यासह वनडे,टी-२० आणि कसोटी रँकिंगमध्ये अव्वल क्रमांकावर पोहोचणारा पहिलाच गोलंदाज ठरला आहे. बुधवारी आयसीसीने कसोटी गोलंदाजांची क्रमवारी जाहीर केली आहे. या यादीत तो ८८१ रेटींग पॉईंट्ससह अव्वल स्थानी आहे.

जसप्रीत बुमराहला केवळ ३४ कसोटी सामने खेळण्याचा अनुभव आहे. या छोट्याश्या कारकिर्दीत त्याने अव्वल स्थानी झेप घेतली आहे. जसप्रीत बुमराहसह रविंद्र जडेजा आणि आर अश्विनचा देखील टॉप १० गोलंदाजांच्या यादीत समावेश आहे.

वनडे,टी-२० आणि कसोटीत नंबर १...

जसप्रीत बुमराहने कसोटी गोलंदाजांच्या यादीत आर अश्विनला मागे सोडत अव्वल स्थानी कब्जा केला आहे. या यादीत आर अश्विनचं नुकसान झालं आहे. तो अव्वल स्थानावरुन तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. तर बुमराह ८८१ रेटींग पॉईंट्ससह अव्वल स्थानी आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा स्टार वेगवान गोलंदाज ८५१ रेटिंग पॉईंट्ससह दुसऱ्या स्थानी आहे. तर ८४१ रेटिंग पॉईंट्ससह आर अश्विन तिसऱ्या स्थानी आहे. भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा ७४६ रेटिंग पॉईंट्ससह नवव्या स्थानी आहे. (Cricket news in marathi)

Jasprit bumrah
IND vs ENG 2nd Test: भारत- इंग्लंड दुसऱ्या कसोटीतील जबरदस्त ५ कॅचेस! Video पाहून तुम्हीच ठरवा कोणती आवडली?

दुखापतीनंतर दमदार कमबॅक...

जसप्रीत बुमराह हा भारतीय संघातील प्रमुख गोलंदाज आहे. मात्र त्याला दुखापतीमुळे गेले काही महिने संघाबाहेर राहावं लागलं होतं. पाठीच्या दुखण्यामुळे त्याला जवळपास एक वर्ष मैदानाबाहेर राहावं लागलं. त्यानंतर गेल्या वर्षी आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतून त्याने कमबॅक केलं होतं.

Jasprit bumrah
IND vs ENG Test Series: सामना जिंकूनही टीम इंडियाची डोकेदुखी वाढली; या कारणांमुळे मालिका जिंकणं कठीण

त्यानंतर आशिया कप आणि वनडे वर्ल्डकप स्पर्धेतही त्याच्या गोलंदाजीचा जलवा पाहायला मिळाला. यावर्षी त्याला ४ कसोटी सामन्यांची संधी मिळाली आहे. या ४ सामन्यांमध्ये दमदार गोलंदाजी करत त्याने कसोटी गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान गाठलं आहे. इंग्लंडविरुद्ध झालेल्या सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये त्याने आतापर्यंत १५ गडी बाद केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com