
आयपीएल स्पर्धा अंतिम टप्प्याकडे आलीय. आयपीएलचे सामने झाल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. इतर देशांचे संघ सु्द्धा दुसऱ्या देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्याच दरम्यान क्रिकेट खेळाबाबत नवी अपडेट आलीय. क्रिकेट खेळात मोठं बदल होणार आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून क्रिकेटमध्ये बदल केले जाणार आहेत. खेळातील अनेक नियमात बदल केला जाणार आहे.
हे नियम जून २०२५ पासून लागू होणार आहेत. बदल करण्यात येणाऱ्या नियमात जुना चेंडू ते बाऊंड्रीवर टिपणारे झेल या नियमात बदल करण्यात येणार आहे. पांढऱ्या चेंडू आणि लाल चेंडूच्या क्रिकेटमधील अनेक नियम बदलली जाणार आहेत. ज्यात गोलंदाज आणि फलंदाजीमध्ये बरोबरीची टक्कर पाहायला मिळणार आहे.
क्रिकबझच्या अहवालानुसार, एकदिवसीय सामन्यांमधील जुना चेंडू, कन्कशन सब्स्टिट्यूट, डीआरएस आणि सीमारेषेवर घेतलेले झेल यांच्या नियमांमध्ये बदल केले जातील. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद पुढील महिन्यापासून खेळात नवी अटी लागू करणार आहे. यात एकदिवसीय सामन्यांमध्ये एकच चेंडू वापरण्यात येणार आहे. ICC नुसार, सुधारित अटी जूनपासून कसोटी सामन्यांमध्ये आणि जुलैपासून आंतरराष्ट्रीय पांढऱ्या चेंडूच्या खेळांमध्ये लागू होतील.
मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये फलंदाजांचं वर्चस्व दिसले. यात गोलंदाज अडचणी येत आहेत. आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये लागू असलेला दोन चेंडूंचा नियम रद्द होण्याची शक्यता आहे. या नियमानुसार, दोन्ही संघांकडून दोन नवीन चेंडू वापरण्यात येत होता. ज्यामुळे गोलंदाजांना स्विंग आणि सीमचा जास्त फायदा करून घेता येत नव्हता.
जून २०२५ पासून लागू होणाऱ्या नवीन नियमांनुसार, एकदिवसीय सामन्यांमध्ये ३४ षटकांपर्यंत दोन चेंडू वापरले जाणार आहेत. त्यानंतर ३५ ते ५० षटकांपर्यंत फक्त १चेंडू वापरला जाईल. क्षेत्ररक्षण करणारा संघ ३५ ते ५० षटकांसाठी वापरण्यासाठी दोन चेंडूंपैकी एक निवडेल. निवडलेला चेंडू उर्वरित सामन्यासाठी दोन्ही संघांकडून वापरला जाईल.
जर समजा पावसामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे एकदिवसीय सामना २५ षटकांपेक्षा कमी खेळवला गेला तर दोन्ही डावांमध्ये फक्त एकच चेंडू वापरला जाईल. एकदिवसीय सामन्यांमधील हा नवीन नियम २ जुलैपासून श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय मालिकेपासून लागू केला जाणार आहे.
कनक्शन सबस्टिट्यूटचा नियम देखील बदलला जाणार आहे. संघांना सामना सुरू होण्यापूर्वी ५ कन्कशन रिप्लेसमेंट खेळाडूंची नावे मॅच रेफरीला सांगावी लागणार आहेत. या ५ खेळाडूंपैकी एक विकेटकीपर, एक फलंदाज, एक वेगवान गोलंदाज, एक फिरकी गोलंदाज आणि एक अष्टपैलू खेळाडू असून द्यावे लागेल.
तसेच आयसीसी लवकरच सर्व संघांना सीमारेषेजवळ पकडले जाणारे झेल आणि डीआरएस प्रोटोकॉलच्या नियमांमधील बदलाची माहिती देणार आहे. याचबरोबर कसोटीतील नवीन नियम २०२५ च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेनंतर लागू केले जाणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.