Team India: गंभीरचं काहीतरी चुकतंय; हा एक निर्णय टीम इंडियाला महागात पडू शकतो

Team India, ICC Champions Trophy 2025: भारतीय संघाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. यादरम्यान गौतम गंभीरने काही धाडसी निर्णय घेतले आहेत.
Team India: गंभीरचं काहीतरी चुकतंय; हा एक निर्णय टीम इंडियाला महागात पडू शकतो
team indiasaam tv
Published On

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय टीम मॅनेजमेंट आणि कोच गौतम गंभीरने काही धाडसी निर्णय घेतला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेदरम्यान भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त झाला होता.

त्यानंतर त्याला इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठीही संधी दिली गेली नव्हती. त्याच्या जागी हर्षित राणाचा समावेश करण्यात आला आहे. मात्र बीसीसीआयने एक चूकीचा निर्णय घेतला आहे, जो चॅम्पियन्स ट्रॉफीत भारतीय संघाला महागात पडू शकतो.

Team India: गंभीरचं काहीतरी चुकतंय; हा एक निर्णय टीम इंडियाला महागात पडू शकतो
Team India: IND vs ENG मालिकेतून टीम इंडियाला काय मिळालं? Champions Trophy आधी किती प्रश्नांची उत्तरं मिळाली?

जसप्रीत बुमराह स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर, हर्षित राणाचा संघात समावेश करण्यात आला. तर अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला संघाबाहेर ठेवण्यात आला आहे. मोहम्मद सिराज, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल यांचा राखीव खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे. हे तिघेही आवश्यकता असल्यास दुबईला जातील.

या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे, मात्र भारतीय संघाचे सामने दुबईत खेळवले जाणार आहेत. दुबईच्या मैदानांवरील रेकॉर्ड पाहिला, तर या मैदानावरील खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना चांगलीच मदत मिळते. २००९ पासूनचा रेकॉर्ड पाहिला, तर या मैदानावर वेगवान गोलंदाजांनी गोलंदाजी करताना ४६६ गडी बाद केले आहेत. तर फिरकी गोलंदाजांना ३३४ गडी बाद करता आले आहेत.

Team India: गंभीरचं काहीतरी चुकतंय; हा एक निर्णय टीम इंडियाला महागात पडू शकतो
IND vs ENG: गिलचं शतक, कोहली- अय्यरचं विराट अर्धशतक! भारताने इंग्लंडसमोर ठेवलं भलंमोठं आव्हान

माजी निवडकर्त्यांनी म्हटले की, ' दुबईतील खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांच्या तुलनेत वेगवान गोलंदाजांना अधिक मदत मिळते. त्यामुळेच पाकिस्तानने आपल्या संघात वेगवान गोलंदाजांना स्थान दिलं आहे. मात्र त्यांना इथे जास्त सामने खेळण्याची संधी मिळणार नाही. '

भारतीय संघाने या स्पर्धेसाठी फिरकी गोलंदाज रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती यांना संधी देण्यात आलं आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघाला बांग्लादेश, न्यूझीलंड आणि पाकिस्तानचा सामना करायचा आहे. या तिन्ही संघांनी वरुण चक्रवर्तीचा सामना केलेला नाही.

Team India: गंभीरचं काहीतरी चुकतंय; हा एक निर्णय टीम इंडियाला महागात पडू शकतो
IND vs ENG: भारत- इंग्लंडचे खेळाडू हिरव्या रंगाची पट्टी घालून मैदानात का उतरले? जाणून घ्या कारण

त्यामुळे त्याला संधी मिळणं निश्चित आहे. असं झाल्यास कुलदीप यादवला बाहेर बसावं लागेल. जसप्रीत बुमराहसारखा अनुभवी गोलंदाज बाहेर गेल्यानंतर मोहम्मद सिराजसारख्या अनुभवी गोलंदाजाला संधी मिळणं अपेक्षित होतं. मात्र असं काहीच झालेलं नाही. हर्षित राणाला संधी मिळणं, हे अनेकांना पटलेलं नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com