ICC Ranking: चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकताच ICC कडून रोहितला मोठं गिफ्ट; शुभमन गिलचीही चांदी

Latest ICC ODI Ranking: आयसीसीकडून वनडे फलंदाजांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत कर्णधार रोहित शर्माला मोठा फायदा झाला आहे.
ICC Ranking: चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकताच ICC कडून रोहितला मोठं गिफ्ट; शुभमन गिलचीही चांदी
rohit sharmatwitter
Published On

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा झाल्यानंतर आयसीसीने वनडे फलंदाजांची क्रमवारी जाहीर केली आहे. या स्पर्धेतील फायनलमध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्माची बॅट चांगलीच तळपली होती. त्याने न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा समाचार घेत ७६ धावांची खेळी केली होती. या खेळीचा फायदा त्याला आयसीसी रँकिंगमध्ये झाला आहे.

रोहित या यादीत तिसऱ्या स्थानी जाऊन पोहोचला आहे. तर सलामीवीर फलंदाज शुभमन गिल अव्वल स्थानी कायम आहे. या स्पर्धेत विराटला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. याचा फटका त्याला रँकिंगमध्ये बसला आहे. तर कुलदीप यादव आणि रविंद्र जडेजाने मोठी झेप घेतली आहे.

ICC Ranking: चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकताच ICC कडून रोहितला मोठं गिफ्ट; शुभमन गिलचीही चांदी
IND vs NZ: टीम इंडिया तर मालामाल पण न्यूझीलंडवरही पैशांचा पाऊस; पाहा दोन्ही संघांना किती मिळाली प्राईज मनी

भारताचा सलामीवीर फलंदाज शुभमन गिल ७८४ रेटींग पॉईंट्ससह अव्वल स्थानी कायम आहे. तर पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझम ७७० रेटींग पॉईंट्ससह दुसऱ्या स्थानी कायम आहे. ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वी रोहित पाचव्या क्रमांकावर होता. आता तो तिसऱ्या स्थानी जाऊन पोहोचला आहे. फायनलमध्ये केलेल्या ७६ धावांच्या खेळीचा त्याला रँकिंगमध्ये फायदा झाला आहे. याच खेळीच्या बळावर त्याची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली होती.

ICC Ranking: चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकताच ICC कडून रोहितला मोठं गिफ्ट; शुभमन गिलचीही चांदी
Ind vs Nz Live : लाइव्ह सामन्यादरम्यान चाहते गौतम गंभीरवर भडकले, काय आहे नेमकं प्रकरण? वाचा

विराट कोहलीचं नुकसान

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातील शतकी खेळी वगळली तर उर्वरीत सामन्यांमध्ये विराट कोहलीला हवी तशी खेळी करता आली नाही. याच सुमार कामगिरीचा त्याला आयसीसीच्या रँकिंगमध्ये चांगलाच फटका बसला आहे. यापूर्वी विराट चौथ्या स्थानी होता. आता तो पाचव्या स्थानी जाऊन पोहोचला आहे.

त्याची रेटींग ७३६ इतकी आहे. तसेच या स्पर्धेत भारतीय संघातील फिरकी गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला. ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वी कुलदीप यादव सहाव्या स्थानी होता. मात्र आता तो ६५० रेटींग पॉईंट्ससह तिसऱ्या स्थानी जाऊन पोहोचला आहे. तर आपल्या अष्टपैलू कामगिरीने सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या रविंद्र जडेजाचाही चांगलाच फायदा झाला आहे. जडेजाने टॉप १० गोलंदाजांच्या यादीत प्रवेश केला आहे. तो १३ हून १० व्या स्थानी जाऊन पोहोचला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com