ICC Ranking: टीम इंडिया फायनलला तर गेली, पण रोहित शर्माचं खूप मोठं नुकसान झालं..नेमकं काय घडलं?

ICC ODI Ranking, Rohit Sharma: आयसीसी वनडे फलंदाजांच्या रँकिंगमध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्माचं मोठं नुकसान झालं आहे.
ICC Ranking: टीम इंडिया फायनलला तर गेली, पण रोहित शर्माचं खूप मोठं नुकसान झालं..नेमकं काय घडलं?
Rohit Sharma Fitness Controversy X (Twitter)
Published On

भारतीय संघाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेची फायनल गाठली आहे. न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये होणाऱ्या सामन्यातील विजेता संघ फायनलमध्ये भारतीय संघाचा सामना करणार आहे. हा सामना होताच आयसीसी वनडे फलंदाजांच्या रँकिंगची घोषणा करण्यात आली आहे.

या रँकिंगमध्ये भारतीय फलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. टॉप १० फलंदाजांमध्ये ४ भारतीय फलंदाजांचा समावेश आहे. भारताचा युवा सलामीवीर फलंदाज शुभमन गिल अव्वल स्थानी कायम आहे. तर विराट कोहली चौथ्या स्थानी जाऊन पोहोचला आहे. तर या रँकिंगमध्ये रोहित शर्माचं मोठं नुकसान झालं आहे.

ICC Ranking: टीम इंडिया फायनलला तर गेली, पण रोहित शर्माचं खूप मोठं नुकसान झालं..नेमकं काय घडलं?
IND vs AUS : इथेच सामना फिरला, अन्यथा भारताच्या हातून फायनल निसटली असती,VIDEO

भारताचा कर्णधार रोहित शर्मा या यादीत २ पावलं खाली सरकला आहे. तो या यादीत पाचव्या स्थानी जाऊन पोहोचला आहे. तर पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम दुसऱ्या स्थानी कायम आहे आणि दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज हेनरीक क्लासेन तिसऱ्या स्थानी कायम आहे.

रोहित शर्माला वनडे फलंदाजांच्या यादीत नुकसान होण्यामागचं एकमेव कारण म्हणजे, फलंदाजीतील सातत्य. कारण डावाची सुरुवात करताना रोहितला चांगली सुरुवात मिळत आहे. पण या सुरुवातीचं रुपांतर त्याला मोठ्या खेळीत करता आलेलं नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सेमीफायनलच्या सामन्यातही त्याला चांगली सुरुवात मिळाली होती.

मात्र या सुरुवातीचं रुपांतर त्याला मोठ्या खेळीत करता आलं नव्हतं. या डावात तो २८ धावांवर असताना खराब शॉट खेळून बाद झाला. याचा फटका त्याला आयसीसीच्या रँकिंगमध्ये बसला आहे.

ICC Ranking: टीम इंडिया फायनलला तर गेली, पण रोहित शर्माचं खूप मोठं नुकसान झालं..नेमकं काय घडलं?
Ind vs Aus: वर्ल्डकप पराभवाची व्याजासह परतफेड! ऑस्ट्रेलियाला लोळवत भारताची फायनलमध्ये धडक

विराट- गिलचा जलवा कायम..

या यादीत रोहित शर्माचं नुकसान झालं आहे. पण शुभमन गिल आणि विराट कोहलीचा जलवा कायम आहे. विराट गेल्या काही महिन्यांपासून आऊट ऑफ फॉर्म होता. मात्र पाकिस्तानविरुद्ध झालेल्या त्याने शतक झळकावून दमदार कमबॅक केल.

त्यानंतर, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातही त्याच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला. या सामन्यात तो शतक झळकावण्याच्या अगदी जवळ पोहोचला होता. मात्र त्याचं शतक थोडक्यात हुकलं. विराट ८४ धावांवर बाद होऊन माघारी परतला. या खेळीच्या बळावर भारताने शानदार विजयाची नोंद केली.

दुसरीकडे गिल सतत फ्लॉप ठरतोय, मात्र तो या रँकिंगमध्ये अव्वल स्थानी कायम आहे. जर विराटने येणाऱ्या काही सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली, तर विराट गिललाही मागे सोडू शकतो. यासह श्रेयस अय्यरलाही मोठा फायदा झाला आहे. अय्यर ९ वरुन ८ व्या स्थानी जाऊन पोहोचला आहे. तर केएल राहुल १५ व्या स्थानी जाऊन पोहोचला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com