Super Over History: सुपर ओव्हरला केव्हा झाली सुरुवात? काय आहे इतिहास ?जाणून घ्या

History Of Super Over: सुपर ओव्हरला सुरुवात केव्हा झाली आणि काय सांगतो सुपर ओव्हरचा इतिहास? जाणून घ्या.
super over
super over Twitter/BCCI

History Of Super Over:

भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत क्रिकेट चाहत्यांना अॅक्शन पॅक सामना पाहायला मिळाला. टी-२० आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच एकाच सामन्यात २-२ सुपर ओव्हर पाहायला मिळाले आहेत. त्यामुळे हा सामना ऐतिहासिक ठरला आहे. दरम्यान सुपर ओव्हरला सुरुवात केव्हा झाली आणि काय सांगतो सुपर ओव्हरचा इतिहास? जाणून घ्या.

केव्हा झाली सुरुवात?

२००७ मध्ये पहिल्यांदाच टी-२० वर्ल्डकप स्पर्धा खेळली गेली होती. या स्पर्धेत सुपर ओव्हरचा नियम लागु केला गेला नव्हता. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना जेव्हा बरोबरीत सुटला होता,त्यावेळी बॉल आऊटने सामन्याचा निकाल लावला गेला होता. त्यानंतर बॉल आऊटचा नियम रद्द करण्यात आला.त्यानंतर २००८ पासून सुपर ओव्हरचा नियम लागु केला गेला.

कोणत्या २ संघांमध्ये खेळली गेली पहिली सुपर ओव्हर?

टी-२० क्रिकेटच्या इतिहासातील सुपर ओव्हरचा पहिला सामना वेस्टइंडिज आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये खेळला गेला होता.यासह वेस्टइंडिजचा संघ सुपर ओव्हर जिंकणारा पहिलाच संघ ठरला होता. ऑक्टोबर २०१२ मध्ये टी-२० सामना बरोबरीत सुटल्यानंतर हा नियम कायसस्वरूपी लागु करण्यात आला. त्यानंतर आयसीसीने या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. (Latest sports updates)

super over
IND vs AFG Super Over: आधी टाय, सुपर ओव्हर अन् पुन्हा एकदा सुपर ओव्हर; सामन्यात नेमकं काय घडलं? पाहा Video

२०१९ नंतर सुपर ओव्हरच्या नियमांमध्ये बदल..

आयसीसी वर्ल्डकप २०१९ स्पर्धेतील फायनलचा सामना बरोबरीत सुटला होता. त्यानंतर या सामन्यात सुपर ओव्हर खेळली गेली होती. मात्र सुपर ओव्हरही टाय झाली होती. त्यामुळे या सामन्याचा निकाल बाऊंड्री काऊंटच्या नियमानुसार लावला गेला होता.

इंग्लंडने मारलेल्या बाऊंड्रीची संख्या जास्त होती. त्यामुळे इंग्लंडला विजेता घोषित केलं गेलं होतं. हा नियम वादग्रस्त ठरला होता. त्यामुळे सुपर ओव्हरच्या नियमांमध्ये बदल केले गेले होते.

super over
Team India News: टीम इंडियाचा वर्ल्डकपचा प्लान ठरला! रोहितचा मोठा खुलासा

टी-२० क्रिकेटच्या इतिहासात डबल सुपर ओव्हर होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील सुपर ओव्हरचे सामने टाय झाले आहेत. आयपीएल २०२० स्पर्धेत याचं उदाहरण पाहायला मिळालं होतं. पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन्ही संघांमध्ये रंगला होता. तर दुसऱ्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाब आणि मुंबई इंडियन्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com