Sarfaraz Khan vs Mark Wood: धरमशालेच्या थंडीत वातावरण तापलं! सरफराज अन् मार्क वुड आमने- सामने; वाचा नेमकं काय घडलं?

IND vs ENG 5th Test: सरफराजने या डावात अर्धशतक पूर्ण केलं. यादरम्यान सरफराज आणि मार्क वुड यांच्यात बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं. ज्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
heated exchange between sarfaraz khan and mark wood during india vs england 5th test watch video
heated exchange between sarfaraz khan and mark wood during india vs england 5th test watch video twitter
Published On

Sarfaraz Khan vs Mark Wood Viral Video:

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना धरमशालेतील HPCA स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आहे.

शुभमन गिल आणि रोहितने शतकी खेळी करत इंग्लंडचा चांगलाच घाम काढला. त्यानंतर राहिलेली कसर सरफराज आणि पडिक्कलने पूर्ण केली. सरफराजने या डावात अर्धशतक पूर्ण केलं. यादरम्यान सरफराज आणि मार्क वुड यांच्यात बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं. ज्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सरफराज- वुड आमने- सामने....

सरफराज खान हा आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. या सामन्यात फलंदाजी करताना त्याने, संथ सुरुवात केली. मात्र एकदा सेट झाल्यानंतर त्याने इंग्लंडच्या गोलंदाजांना धु धु धुतलं.

heated exchange between sarfaraz khan and mark wood during india vs england 5th test watch video
IND vs ENG 5th Test: रोहित शर्मा- शुबमन गिलचा 'शतकी' तडाखा! इंग्लिश गोलंदाजांना चोपून काढलं

यादरम्यान त्याने मार्क वुडला टार्गेट केलं. मार्क वुड गोलंदाजी करत असताना त्याने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. त्यावेळी मार्क वुड सरफराज खानला काहीतरी बोलताना दिसून आला. मार्क वुडने तोंडाने बोलत होता. तर सरफराज खान आपल्या बॅटने उत्तर देत होता. (Cricket news in marathi)

या डावातील ७६ व्या षटकात मार्क वुड गोलंदाजी करण्यासाठी आला होता. या षटकात सरफराजने मार्क वुडच्या डोक्यावरुन चौकार मारला. त्यानंतर सरफराजने पुढच्या चेंडूवर यष्टीरक्षकाच्या डोक्यावरुन अप्रतिम शॉट मारला. इतका वेगवान चेंडू त्याने सहज खेळून काढला हे पाहून मार्क वुड संतापला. चौथा चेंडू सरफराजच्या पॅडला जाऊन लागला. त्यानंतर वुडने पायाने चेंडू यष्टीच्या दिशेने ढकलला.

सरफराजची अर्धशतकी खेळी...

सरफराज खान या डावात ६० चेंडूत ५६ धावांची खेळी करत माघारी परतला. या खेळीदरम्यान त्याने ८ चौकार आणि १ षटकार मारला. त्याने देवदत्त पडिक्कलसोबत मिळून महत्वपूर्ण भागीदारी केली. या भागीदारीच्या बळावर भारतीय संघाने मोठी आघाडी घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com