Haris Rauf Viral Video: भारतीय समजून हारिस रौफने पाकिस्तानी फॅनसोबत घातला राडा; पाहा VIDEO

Haris Rauf Fight Video: पाकिस्तान संघाचा वेगवान गोलंदाज हारिस रौफने फॅनसोबत राडा घातला आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
Haris Rauf Viral Video: भारतीय समजून हारिस रौफने पाकिस्तानी फॅनसोबत घातला राडा; पाहा VIDEO
haris rauftwitter

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत पाकिस्तानचा संघ पूर्णपणे फ्लॉप ठरला. टी-२० वर्ल्डकपवर नाव कोरणाऱ्या पाकिस्तानलला पहिल्यांदाच वर्ल्डकप खेळत असलेल्या अमेरिकेने हरवलं. त्यानंतर भारतीय संघाकडूनही पराभवाचा सामना करावा लागला. या सुमार कामगिरीनंतर पाकिस्तान संघावर जोरदार टिका केली जात आहे. पाकिस्तानची ही फ्लॉप कामगिरी पाहता,कर्णधार बदलण्याची आणि संघातील खेळाडूंची हकालपट्टी करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. दरम्यान पाकिस्तानचा संघ स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर संघातील अनुभवी खेळाडू हारिस रौफचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागला आहे.

पाकिस्तानी संघाचा टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतून पॅकअप झाला आहे. मात्र अजूनही काही खेळाडू अमेरिकेत आहेत. अमेरिकेत असताना हारिस रौफने पाकिस्तान फॅनसोबत राडा घातला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हारिस रऊफ चक्क क्रिकेट फॅनच्या अंगावर धावून जाताना दिसून येत आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तो फॅन म्हणतोय, मला एक फोटो हवा होता. मात्र हारिस रौफ त्याच्या अंगावर धावून जातोय. त्यावेळी हारिस रौफ म्हणतोय की, बापाला शिवी का देतोय... हा भारतीयच असेल..' मात्र त्यानंतर तो फॅन पुन्हा म्हणतो की, 'मी पाकिस्तानीच आहे.'

Haris Rauf Viral Video: भारतीय समजून हारिस रौफने पाकिस्तानी फॅनसोबत घातला राडा; पाहा VIDEO
IND vs AFG, Super 8: अफगाणिस्तानकडून टीम इंडियाचा पराभव निश्चित? बारबाडोसमध्ये चिंता वाढवणारा राहिलाय रेकॉर्ड

हारिस रौफ ऐकून घेण्याचा मनस्थितीत नसल्याचं दिसून येत आहे. त्याची पत्ती त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते. यासह त्याचा मॅनेजर आणि काही लोकं देखील त्याला थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत. मात्र हारिस रऊफ काही थांबत नाही. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

हारिस रौफच्या आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने ४ सामन्यांमध्ये ७ फलंदाजांना पॅव्हेलियनची वाट दाखवली. यादरम्यान २१ धावा खर्च करत ३ गडी बाद ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे.

Haris Rauf Viral Video: भारतीय समजून हारिस रौफने पाकिस्तानी फॅनसोबत घातला राडा; पाहा VIDEO
IND vs AFG, Super 8: टीम इंडियाला मोठा धक्का! सुपर 8 आधीच प्रमुख फलंदाज दुखापतग्रस्त

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com