Hardik Pandya Tweet: सलग ३ पराभवानंतर हार्दिक पंड्या भावुक! मुंबईच्या फॅन्ससाठी खास मेसेज; पोस्ट तुफान व्हायरल

Hardik Pandya Tweet For Mumbai Indians Fans: राजस्थानविरुद्ध झालेल्या सामन्यात हार्दिक पंड्याला चांगली सुरुवात मिळाली होती. मात्र या खेळीचं तो मोठ्या खेळीत रुपांतर करु शकला नाही. या पराभवानंतर त्याने मुंबईच्या फॅन्सना खास मेसेज दिला आहे.
hardik pandya
Hardik Pandya Emotional Post For Mumbai Indians Fans After Back To Back 3 Defeats MI Vs RRtwitter

Hardik Panyda Latest Tweet For Mumbai Indians Fans:

आयपीएल स्पर्धेत ५ वेळेस जेतेपदावर नाव कोरणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाला आयपीएल २०२४ स्पर्धेत हवी तशी सुरुवात करता आलेली नाही. स्पर्धेतील सुरुवातीच्या तिन्ही सामन्यांमध्ये या संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या हंगामात संघाच्या नेतृ्त्वाची जबाबदारी हार्दिक पंड्याकडे सोपवण्यात आली आहे. राजस्थानविरुद्ध झालेल्या सामन्यात हार्दिक पंड्याला चांगली सुरुवात मिळाली होती. मात्र या खेळीचं तो मोठ्या खेळीत रुपांतर करु शकला नाही. या पराभवानंतर त्याने मुंबईच्या फॅन्सना खास मेसेज दिला आहे.

hardik pandya
RCB vs LSG, IPL 2024: बंगळुरु- लखनऊ येणार आमने-सामने! केएल राहुल खेळणार का? पाहा दोन्ही संघांची प्लेइंग ११

हार्दिक पंड्याचं खास ट्वीट..

राजस्थानविरुद्ध झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला ६ गडी राखून परभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर त्याने एक ट्वीट केलं आहे. ज्यात त्याने लिहिले की, ' या संघाबद्दल तुम्हाला एक गोष्ट माहित असायला हवी, हा संघ कधीच हार मानत नाही. आम्ही लढा देत राहु आणि पुढे जात राहु.' हार्दिक पंड्याची ही पोस्ट सध्या तुफान चर्चेत आहे. ज्या फॅन्सने मुंबईच्या विजयाची आशा करणं सोडून दिलं आहे. अशा फॅन्ससाठी हा खास मेसेज आहे. हार्दिकने फॅन्सला दिलासा दिला आहे आणि सांगितलं आहे की, मुंबईचा संघ नक्कीच कमबॅक करेल.

राजस्थानविरुद्धच्या पराभवानंतर बोलताना काय म्हणाला हार्दिक पंड्या?

वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) राजस्थान रॉयल्स संघाकडून ६ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान या पराभवानंतर बोलताना हार्दिक पंड्या म्हणाला की, 'आम्ही हवी तशी सुरुवात करू शकलो नाही. मला असं वाटलं की, आम्ही १५० किंवा १६० धावांपर्यंत पोहचू शकलो असतो. मात्र माझी विकेट पडली आणि सामना फिरला. त्यानंतर ते चांगल्या स्थितीत आले. मला वाटतं की, मी अजून चांगला खेळ करू शकलो असतो.'

hardik pandya
IPL 2024 Updated Schedule: BCCI चा मोठा निर्णय! IPL सुरु असताना वेळापत्रक बदललं; वाचा लेटेस्ट अपडेट

मुंबईचा एकतर्फी पराभव..

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, राजस्थान रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्स संघाला २० षटकअखेर ९ गडी बाद १२५ धावा करता आल्या. या धावांचा पाठलाग करताना रियान परागने अर्धशतकी खेळी केली. या खेळीच्या बळावर त्याने राजस्थान रॉयल्स संघाला ६ गडी राखून विजय मिळवून दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com