GT vs PBKS: अय्यरचं शतक थोडक्यात हुकलं, पण पंजाबने इतिहास रचला; गुजरातसमोर ठेवलं रेकॉर्डब्रेकिंग आव्हान

GT vs PBKS Highlights: अहमदाबादच्या मैदानावर गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात सुरु असलेल्या सामन्यात पंजाबने २४३ धावांचा डोंगर उभरला आहे.
GT vs PBKS: अय्यरचं शतक थोडक्यात हुकलं, पण पंजाबने इतिहास रचला; गुजरातसमोर ठेवलं रेकॉर्डब्रेकिंग आव्हान
shreyas iyertwitter
Published On

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना सुरु आहे. या सामन्यात युवा फलंदाज शुभमन गिल गुजरात टायटन्स संघाचं नेतृत्व करण्यासाठी मैदानात उतरला आहे.

तर गेल्या हंगामात केकेआरचं नेतृत्व करणारा श्रेयस अय्यर पहिल्यांदाच पंजाब किंग्ज संघाचं नेतृत्व करण्यासाठी मैदानात आला आहे. या सामन्यात गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या पंजाबने २० षटकअखेर २४३ धावांचा डोंगर उभारला आहे.

GT vs PBKS: अय्यरचं शतक थोडक्यात हुकलं, पण पंजाबने इतिहास रचला; गुजरातसमोर ठेवलं रेकॉर्डब्रेकिंग आव्हान
IPL 2025: नवा कर्णधार, जुनी गोष्ट! पराभवानंतर ऋषभ पंतवर भर मैदानात संतापले संजीव गोएंका? Video झाला व्हायरल

अय्यरची वादळी खेळी

या सामन्यात पंजाब किंग्ज संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण मिळालं होतं. पंजाबकडून डावाची सुरुवात करण्यासाठी प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग ही विस्फोटक जोडी मैदानावर आली होती. प्रभसिमरन सिंग स्वस्तात माघारी परतला. पण पदार्पणवीर प्रियांश आर्यने पंजाबच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला .

त्याने २३ चेंडूंचा सामना करत ४७ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ७ चौकार आणि २ षटकार मारले. अजमतुल्लाह ओमरजाईने १५ चेंडूंचा सामना करत १६ धावांची खेळी केली. या सामन्यात ग्लेन मॅक्सवेल पहिल्याच चेंडूवर पायचित होऊन माघारी परतला. मार्कस स्टोइनिसने १५ चेंडूंचा सामना करत २० धावांची खेळी केली.

GT vs PBKS: अय्यरचं शतक थोडक्यात हुकलं, पण पंजाबने इतिहास रचला; गुजरातसमोर ठेवलं रेकॉर्डब्रेकिंग आव्हान
DC vs LSG IPL 2025: 'इम्पॅट' प्लेअर ठरला 'हिरो'; आशुतोष शर्मानं धमाकेदार फलंदाजी करत लखनौला नमवलं

शेवटी शशांक सिंग आणि श्रेयस अय्यरच्या झंझावाती फलंदाजीचा नजराना पाहायला मिळाला. या दोघांनी मिळून गुजरातच्या गोलंदाजांना चांगलच धुतलं. कर्णधार श्रेयस अय्यर या डावात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता.

GT vs PBKS: अय्यरचं शतक थोडक्यात हुकलं, पण पंजाबने इतिहास रचला; गुजरातसमोर ठेवलं रेकॉर्डब्रेकिंग आव्हान
IPL 2025 : हैदराबाद मुंबईविरुद्ध ३०० धावा मारणार; आरसीबीच्या माजी खेळाडूची मोठी भविष्यवाणी, पण 'पलटन' गेम पालटणार?

तो शेवटपर्यंत खेळपट्टीवर टीकून राहिला. या डावात त्याने ४२ चेंडूंचा सामना करत ९७ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने ५ चौकार आणि ९ षटकार खेचले. तर शशांक सिंगने १६ चेंडूंचा सामना करत नाबाद ४४ धावांची खेळी केली. श्रेयस अय्यरचं शतक अवघ्या ३ धावांनी हुकलं. तो ९७ धावांवर नाबाद राहिला. तर पंजाबने २० षटकअखेर ५ गडी बाद २४३ धावा केल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com