GT vs DC, IPL 2024: अहमदाबादमध्ये गुजरात-दिल्ली भिडणार! हे खेळाडू ठरु शकतात 'गेम चेंजर'

Players To Watch Out In GT vs DC Match: आयपीएल २०२४ स्पर्धेतील ३२ वा सामना गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे.
GT vs DC Players to watch out in gujarat titans vs delhi capitals match shubman gill rashid khan amd2000
GT vs DC Players to watch out in gujarat titans vs delhi capitals match shubman gill rashid khan amd2000twitter

आयपीएल २०२४ स्पर्धेतील ३२ वा सामना गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरात टायटन्स संघाने आतापर्यंत ६ सामने खेळले आहेत. यादरम्यान २ सामने जिंकले आहेत. तर ४ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार शुभमन गिल आणि अनुभवी गोलंदाज राशिद खान हे दोघेही गुजरात टायटन्स संघासाठी गेम चेंजर ठरु शकतात.

गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार शुभमन गिल या हंगामातही शानदार फॉर्ममध्ये असल्याचं पाहायला मिळालं आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या ६ सामन्यांमध्ये २५५ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने २ अर्धशतकं झळकावली आहेत. त्याने पंजाब किंग्ज संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने ८९ धावांची तुफानी खेळी केली होती. हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या मैदानावर खेळताना गिलचा रेकॉर्ड शानदार राहिला आहे. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणाऱ्या सामन्यात गिल गेम चेंजर ठरु शकतो.

GT vs DC Players to watch out in gujarat titans vs delhi capitals match shubman gill rashid khan amd2000
KKR vs RR, IPL 2024: राजस्थानविरुद्धच्या पराभवानंतर KKR ला मोठा धक्का! श्रेयस अय्यरवर IPL ची मोठी कारवाई

तर राशिद खान हा संघातील अनुभवी गोलंदाज आहे. तो गोलंदाजीसह फलंदाजीतही मोलाचं योगदान देतो. राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने फलंदाजी करताना २४ धावांची महत्वपूर्ण खेळी केली होती. तर गोलंदाजी करताना त्याने अवघ्या १८ धावा खर्च करत १ गडी देखील बाद केला.

GT vs DC Players to watch out in gujarat titans vs delhi capitals match shubman gill rashid khan amd2000
RCB,IPL 2024: RCB ला मोठा धक्का! स्टार खेळाडूची IPL मधून अनिश्चित काळासाठी विश्रांती

हा सामना सोडला तर उर्वरित सामन्यांमध्ये त्याला फलंदाजीत योगदान देता आलेलं नाही. जर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणाऱ्या सामन्यात त्याला फलंदाजी करण्याची संधी मिळाली तर, तो फलंदाजीतही योगदान देऊ शकतो.

या सामन्यासाठी अशी असू शकते गुजरात टायटन्स संघाची प्लेइंग ११..

शुभमन गिल (कर्णधार), मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), साई सुदर्शन, डेव्हिड मिलर, विजय शंकर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, राशिद खान, साई किशोर, उमेश यादव, स्पेंसर जॉनसन.

इम्पॅक्ट प्लेअरशाहरुख खान

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com