GT vs CSK : गुजरातकडून चेन्नईचा दारूण पराभव, प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा कायम; बेंगळुरूला धक्का

Gujarat Titans Vs Chennai Supers Kings/IPL2024 : शुभमन गिल आणि साई सुरदर्शनयांच्या वेगवान शकताच्या जोरावर २३२ धावांच आव्हान चेन्नईसमोर होतं. मात्र धावांचा पाठलाग करताना चेन्नईचा संघ सुरुवातीपासूनच गडगडला आणि ३६ धावांनी दारून पराभव स्वीकारावा लागला.
GT vs CSK
GT vs CSKSaam Digital

गुजरात टायटन्स आणि चेन्रई सुपर किंग्जमध्ये आज नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएलचा सामना रंगला होता. या सामन्यात गुजरात टायटन्सकडून दोन शतकं झळकवण्यात आली. शुभमन गिल आणि साई सुरदर्शनयांच्या वेगवान शकताच्या जोरावर २३२ धावांच आव्हान चेन्नईसमोर होतं. मात्र धावांचा पाठलाग करताना चेन्नईचा संघ सुरुवातीपासूनच गडगडला आणि ३६ धावांनी दारून पराभव स्वीकारावा लागला.

याविजयासह शुभमन गिलच्या संघाने आयपीएल 2024 मध्ये प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा किमान पुढील सामन्यापर्यंत कायम ठेवल्या आहेत. तर पराभवामुळे चेन्नई सुपर किंग्जच्या प्लेऑफच्या मार्गात अडचणी निर्माण झाल्या आहेत. आता पुढच्या सामन्यात चेन्रईसाठी करो या मरो ची परिस्थिती असेल, पुढचा सामना गमवला तर प्लेऑफमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे. चेन्नईचा 12 सामन्यांमधला हा सहावा पराभव असला तरी संघ अजूनही चौथ्या स्थानावर आहे.

प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने २० षटकांत ३ बाद २३१ धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात चेन्नईच्या संघाला केवळ १९६ धावा करता आल्या. गुजरातकडून शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांनी तुफानी शतकं झळकवलीच पण मोहित शर्मा आणि रशीद खान यांनी गोलंदाजीतही कमाल केली. मोहितने ३ तर राशिदने २ बळी घेतले.

GT vs CSK
GT vs CSK : 'सुदर्शन'ने चेन्नईच्या गोलंदाजांना गरागरा फिरवलं; साई-गिलनं फोडून काढलं; २३२ धावांचं टार्गेट

चेन्नई सुपर किंग्जला शेवटच्या ३ षटकात विजयासाठी ६४ धावांची गरज होती. यावेळी राशिद खान १८ वं शतक टाकण्यासाठी समोर होता. त्याने तिसऱ्या चेंडूवर रवींद्र जडेजाला झेलबाद केलं. जडेजाने १० चेंडूत १८ धावा केल्या. मिचेल सँटनरही याच षटकात ५व्या चेंडूवर शून्यानर तंबूत परतला. २ षटकात ६२ धावांची गरज असताना धोनी मैदानात उतरला होता. धोनी क्रीजवर असला तरी २ षटकात ६२ धावा करणे जवळपास अशक्य होतं. तरीही धोनीने ३ षटकार ठोकले. मात्र संघाचा पराभव झाला.

GT vs CSK
Explainer : मुंबई इंडियन्सचा फ्लॉप शो, फक्त एकटा हार्दिक पंड्याच जबाबदार आहे का? ट्रोल करायला हवं का ?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com