GT vs CSK : 'सुदर्शन'ने चेन्नईच्या गोलंदाजांना गरागरा फिरवलं; साई-गिलनं फोडून काढलं; २३२ धावांचं टार्गेट

Gujarat Titans Vs Chennai Supers Kings/IPL2024 : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज जणू साई सुरदर्शन आणि शुभमन गिलचं वादळ आलं होतं. दोघांनीनी धुवांधार बॅटींग करत तुफानी शतकं केली. चेन्नईचे गोलंदाज अक्षरश: हतबल झालेले पहायला मिळाले.
GT vs CSK
GT vs CSKSaam Digital

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज जणू साई सुरदर्शन आणि शुभमन गिलचं वादळ आलं होतं. दोघांनीनी धुवांधार बॅटींग करत तुफानी शतकं केली. चेन्नईचे गोलंदाज अक्षरश: हतबल झालेले पहायला मिळाले. गिल आणि सुरर्शनच्या शतकांच्या जोरावर गुजरात टायटन्स संघाने चेन्नई सुपर किंग्जला 232 धावांच तगडं आव्हान दिलं आहे.

 प्रथम शुबमन गिलने ५० चेंडूत आयपीएल मधील चौथ शतक पूर्ण केले. त्याने ९ चौकार आणि ४ षटकार ठोकत १०४ धावा केल्या. तर साई सुदर्शनने आयपीएल कारकीर्दीतील पहिलं शतक झळकावलं. त्यानेही अवघ्या ५० चेंडूत शतक पूर्ण केलं. त्याने ७ षटकार आणि ५ चौकार ठोकत १०३ धावा केल्या.

नाणेफेक जिंकल्यानंतर चेन्नईन क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने २० षटकांत ३ गडी गमावून २३१ धावा केल्या. कर्णधार शुबमन गिल आणि साई सुदर्शनने पहिल्या विकेटसाठी २१० धावांची विक्रमी भागीदारी केली.

GT vs CSK
GT vs CSK,IPL 2024: गुजरातसाठी 'करो या मरो' लढत! GT vs CSK सामन्यात खेळपट्टी कोणाला देणार साथ? कसं असेल हवामान?

त्यानंतर लागोपाठ दोघंही बाद झाले. त्यानंतर आलेला डेव्हिड मिलर ११ चेंडूत १६ धावा करून नाबाद राहिला. शाहरुख खान २ धावा करून रनआऊट झाला. चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेने २ बळी घेतले. चेन्नईने पहिल्या सहा षटकातच ५८ धावा दिल्या होत्या. १५ षटकांपर्यंत गुजरातचा एकही विकेट पडला नव्हता. १५ षटकात गुजरातची धावसंख्या एकही विकेट न गमावता १९० धावा होती. शेवटच्या पाच षटकांत मात्र गुजरातच्या संघाला केवळ ४१ धावा करता आल्या. या ५ षटकात ३ विकेटही गमावल्या.

GT vs CSK
Ishan Kishan's BCCI Contract: इशान किशन, श्रेयस अय्यरचं BCCI कॉन्ट्रॅक्ट कुणी रद्द केलं? जय शहांनी नावासहित कारणही सांगितलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com