Pele Death: चहा विकणारा पोरगा ते फूटबॉलचा जादूगार; असा होता पेलेंचा 'स्ट्रगलर ते स्टार' होण्यापर्यंतचा संघर्षमय प्रवास
Football Legend Pele Death: ब्राझीलचे महान फूटबॉलपटू पेले यांच्या निधनाने संपूर्ण फूटबॉल जगतावर शोककळा पसरली आहे. तीन विश्वचषक जिंकणारे एकमेव फूटबॉलपटू अशी त्यांची ओळख होती. आपल्या असामान्य खेळीने त्यांनी फुटबॉल जगतात अनेक विक्रम आपल्या नावावर केले होते. त्यामुळेच त्यांना फुटबॉलचा जादूगार म्हणूनही ओळखले जाते.
फुटबॉलमध्ये नावलौकिक मिळवण्यासाठी पेलेंना आयुष्यात मोठा संघर्ष करावा लागला. पाहूया चहा विकणारा पोरगा ते फुटबॉलचा जादूगार अशी ओळख मिळवणाऱ्या पेलेंचा संघर्षमय प्रवास. (Football)
23 ऑक्टोबर 1940 रोजी ब्राझीलमध्ये जन्मलेले पेले सुरूवातीला उदरनिर्वाहासाठी चहाच्या दुकानात काम करायचे. त्यांना लहानपणापासूनच फुटबॉलची आवड होती. त्यांना फुटबॉलचे धडे त्यांच्या वडिलांनी दिले होते, पण त्यांना विकत घ्यायला फुटबॉल परवडत नव्हता. त्यामुळे ते सॉक्समध्ये वर्तमानपत्र भरून फुटबॉल खेळत असे. सुरुवातीच्या काळात ते अनेक हौशी संघांसोबत खेळले. त्यांनी 2 यूथ स्टेट चॅम्पियनशिपमध्ये बौरू अथलेटिक क्लब ज्युनियर्सचे नेतृत्वही केले.
पेलेंचा महान फुटबॉल प्रवास इनडोअर फुटबॉलने सुरू झाला. ते एका संघात सामील झाले आणि सामील झाल्यानंतर त्यांच्या क्षेत्रात इनडोअर फुटबॉल देखील खूप लोकप्रिय झाला. आपल्या भागातील पहिली फुटसल स्पर्धा जिंकणाऱ्या संघाचाही ते एक भाग होते. पेले आणि त्यांच्या संघाने पहिले विजेतेपद जिंकले आणि येथून शतकातील महान खेळाडू होण्याच्या ऐतिहासिक प्रवासाला सुरुवात झाली.
दरम्यान, वयाच्या १४ व्या वर्षापर्यंत ते स्थानिक सामने खेळत होते. त्यानंतर १५ व्या वर्षी त्यांनी सांतोस क्लबकडून पदार्पण करत फुटबॉल जगतात पाऊल ठेवले. यानंतर एकाच वर्षात त्यांची ब्राझीलच्या (Brazil) राष्ट्रीय संघात निवड झाली आणि बघता बघता एकाच वर्षात त्यांनी विश्वचषकाला गवसणी घालत सर्वात कमी वयात वर्ल्डकप जिंकण्याचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.