VIDEO : हिराबेन मोदी अनंतात विलिन; PM मोदींनी दिला मुखाग्नी, गांधीनगरमध्ये शोककुल वातावरणात अंत्यसंस्कार

हिराबेन मोदी यांच्यावर गांधीनगर येथील स्मशानभूमीत शोककूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
 Heeraben Modi Passed Away
Heeraben Modi Passed AwaySaam TV
Published On: 

PM Narendra Modi's Mother Heeraben Modi Passed Away : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचं आज पहाटेच्या सुमारास निधन झालं. वयाच्या १०० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आईच्या निधनाची माहिती स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत दिली. आई हिराबेन यांच्या निधनाची बातमी कळताच, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहमदाबाद येथे पोहचले. रुग्णालयातच त्यांनी आईच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. (Latest Marathi News)

 Heeraben Modi Passed Away
Rishabh Pant Accident : क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात, रुग्णालयात उपचार सुरू

पंतप्रधान मोदी सकाळी ७ वाजून ४५ मिनिटाला अहमदाबादला पोहोचले. येथून ते थेट गांधीनगरच्या रायसण गावात भाऊ पंकज मोदी यांच्या घरी गेले. मोदी घरी पोहोचताय अंत्ययात्रेला सुरुवात झाली. त्यानंतर आईच्या पार्थिवाला खांदा देऊन पुत्र धर्म निभावला. यावेळी मोदी प्रचंड भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.

दरम्यान, हिराबेन मोदी यांच्यावर गांधीनगर येथील स्मशानभूमीत शोककूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्यासह त्यांच्या भावंडांनी आई हिराबेन यांना मुखाग्नी दिला. यावेळी मोदी प्रचंड भावूक झाले होते. मोदींच्या निधनाची बातमी कळताच, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, जे.पी. नड्डा, काँग्रेस नेते राहूल गांधी, राजनाथ सिंह यांच्यासह देशभरातील अनेक नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

जून महिन्यामध्ये वयाची शंभरी ओलांडलेल्या हिराबेन मोदी यांना अस्वस्थ वाटू लागल्याने २८ डिसेंबर रोजी यूएन मेहता रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. पंतप्रधान मोदी त्याच दिवशी आईला भेटण्यासाठी अहमदाबाद गेले होते. आज रात्री साडेतीनच्या सुमारास हिराबेन मोदी यांनी अखेरचा श्वास घेतला.

रुग्णालयाने हिराबेन मोदी यांच्या मृत्यूची माहिती एका पत्रकाद्वारे जारी केली आहे. ३० डिसेंबर २०२२ रोजी यू. एन. मेहता रुग्णालयामध्ये हिराबेन मोदी यांचं उपचारादरम्यान निधन झालं. त्यांनी पहाटे ३ वाजून ३० मिनिटांनी अखेरच्या श्वास घेतला, असं रुग्णालयाने म्हटलं आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.