IND vs PAK: अंगावर शहारे आणणारा क्षण! सव्वा लाख भारतीयांनी गायलं राष्ट्रगीत; पाहा VIDEO

IND vs PAK National Anthem Viral Video: भारत- पाकिस्तान सामन्यादरम्यान सव्वा लाखांहुन अधिक लोकांनी राष्ट्रगीत गायलं आहे, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.
IND vs PAK
IND vs PAKSaam tv news
Published On

IND vs PAK:

वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्हॉल्टेज सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यासाठी बीसीसीआयने रंगारंग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या कार्यक्रमाचं लाईव्ह प्रक्षेपण करता आलं नाही.

दरम्यान सामन्याच्या नाणेफेकी भारतीयांची मान अभिमानाने उंचावणारा क्षण पाहायला मिळाला. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकला. नाणेफेक जिंकून भारतीय संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर दोन्ही संघ राष्ट्रगीतासाठी मैदानावर उतरले. आधी पाकिस्तानचं राष्ट्रगीत गायलं गेलं. भारताचं राष्ट्रगीत सुरू होताच ११ खेळाड़ूंसह स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या सव्वा लाख प्रेक्षकांनी एकच सुर लावला.अंगावर काटा आणणाऱ्या क्षणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.

भारत-पाकिस्तान सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिकूंन प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाने प्लेइंग ११ मध्ये मोठा बदल केला आहे. या सामन्यासाठी इशान किशनला बाहेर करून शुभमन गिलला संधी देण्यात आली आहे. (Latest sports updates)

IND vs PAK
IND vs PAK Record: वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाच शेर!पाहा कसा राहिलाय IND vs PAK सामन्याचा आतापर्यंतचा रेकॉर्ड

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

IND vs PAK
#shorts : IND vs PAK सामन्याला सुरुवात, भारतीय गोलंदाजांकडून पाकिस्तानी फलंदाजांची विकेट

पाकिस्तान संघ:

अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हरिस रउफ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com