Gautam Gambhir : टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममधील खासगी चर्चा व्हायरल करणारा कोण? गौतम गंभीरने 'या' बॅट्समनचे नाव घेतले

Gautam Gambhir Dressing Room Controversy : ऑस्ट्रेलियात चौथ्या कसोटी सामन्यानंतर भारताच्या ड्रेसिंग रुममधील चर्चा लीक झाल्या होत्या. याला कोण कारणीभूत आहे हे गंभीरने सांगितले आहे.
Gautam Gambhir Dressing Room Controversy
Gautam Gambhir Dressing Room ControversySaam Tv
Published On

Gautam Gambhir Statement : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारताला ३-१ ने पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय संघाला चौथ्या कसोटी सामन्यात लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. पाचवा आणि शेवटचा सामना कसोटी भारतासाठी खूप महत्त्वपूर्ण होता. तेव्हा पाचव्या सामन्यात संघाकडून चांगली कामगिरी व्हावी या उद्देशाने प्रशिक्षक गौतम गंभीरने खेळाडूंना तंबी दिली होती. दरम्यान ड्रेसिंग रुममधील गंभीरचे हे संभाषण माध्यमांमध्ये लीक झाले.

न्यूज 24 ने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय संघाचा प्रमुख प्रशिक्षक गौतम गंभीरने ड्रेसिंग रुममधील खासगी माहिती लीक केल्याचा आरोप सरफराज खानवर आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी तो भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता. पण सरफराज खानला एकाही कसोटी सामन्यात संघामध्ये स्थान मिळाले नव्हते.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयच्या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांसमोर गौतम गंभीरने सरफराज नाव घेतले. त्याने ड्रेसिंग रुममधील खासगी चर्चांची माहिती माध्यमांमध्ये लीक केली असे गंभीरने म्हटले. या बैठकीला कर्णधार रोहित शर्मा आणि निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर देखील उपस्थित होते.

Gautam Gambhir Dressing Room Controversy
Jasprit Bumrah Back Injury : टीम इंडियाचे टेन्शन वाढले! जसप्रीत बुमराह बेड रेस्ट घेणार, मैदानात कधी परतणार?

सूत्रांच्या माहितीनुसार, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील पहिल्या चार सामन्यांमध्ये चांगला खेळ न केल्याने गंभीरने संघातील सर्वांना फटकारले होते. केलेल्या सूचनांचे पालन खेळाडू करत नाही असे त्याचे मत होते. तेव्हा सूचनाचे पालन करा नाहीतर संघातून वगळण्यात येईल अशा शब्दात गंभीरने सर्वांना बजावले होते. ड्रेसिंग रुममधील ही माहिती लीक झाल्यानंतर गंभीर प्रचंड रागावला होता.

Gautam Gambhir Dressing Room Controversy
IND W vs IRE W: भारतीय महिला संघाने इतिहास रचला! ४७ वर्षांत पहिल्यांदाच केली ही रेकॉर्डब्रेक कामगिरी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com