GameOver:Chetan Sharma Sting Operation- सध्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना जिंकून भारतीय संघाने १-० ची आघाडी घेतली आहे. एकीकडे भारतीय संघ जोरदार कामगिरी करतोय. तर दुसरीकडे बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी काही धक्कादायक खुलासे केले आहे.
भारतीय संघ हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात मजबूत संघ आहे. भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी सतत चांगली कामगिरी करण्यासह फिटनेस असणं देखील तितकच गरजेचं आहे. मात्र चेतन शर्मा यांनी केलेल्या खुलास्यानुसार, भारतीय संघात स्थान मिळवायचे असेल तर बीसीसीआयच्या निवड समितीच्या अध्यक्षांसोबत चांगले संबंध असणं गरजेचं आहे.
क्रिकेट चाहत्यांना नेहमी वाटतं की, एखाद्या खेळाडूला भारतीय संघात संधी तेव्हाच दिली जाते. जेव्हा तो फिट असतो आणि सातत्याने चांगली कामगिरी करत असतो. मात्र असं काहीच नाहीये. जर खेळाडू हा निवडकर्त्याचा आवडता खेळाडू असेल तर, तो फिट नसला किंवा चांगली कामगिरी करत नसला तरी भारतीय संघात खेळणार.
सेटिंग करा आणि संघात स्थान मिळवा..
झी न्यूजने एक स्टिंग ऑपरेशन केले आहे. ज्यामध्ये चेतन शर्मा यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, खेळाडू किती पुढे जाणार हे निवडकर्त्याचा हातात असते. त्यांनी म्ह्टले की,'रोहित शर्मा माझी भेट घेत असतो. तो आर्धा -आर्धा तास कॉलवर बोलतो. हार्दिक पंड्या माझ्या सोफ्यावर येऊन झोपतो. उमेश आणि हुड्डा माझी भेट घेण्यासाठी येत असतात. काही खाजगी गोष्टी सांगतात.'
चेतन शर्मांनी केलेले काही धक्कादायक खुलासे..
- मुख्य निवडकर्ता म्हणजे भारतीय क्रिकेट.. चेतन शर्मांच्या म्हणण्यानुसार, भारतीय क्रिकेट हे खेळाडूंच्या कौशल्यानुसार नव्हे तर त्यांच्या इशाऱ्यावर चालते.
- भारतीय संघ म्हणजेच मुख्य निवडकर्ता. संघात खेळत असलेला प्रत्येक खेळाडू हा त्याच्या कामगिरीच्या बळावर नव्हे तर, आमच्या आवडी निवडीनुसार खेळतोय.
- मुख्य निवडकर्ता म्हणजे भारतीय क्रिकेटचे भविष्य..चेतन शर्मांच्या म्हणण्यानुसार, एखादा खेळाडू निवडकर्त्याचा आवडता खेळाडू असेल तर त्याचे भविष्य उज्ज्वल आहे. तो चांगली कामगिरी करत नसला तरीदेखील तो संघासाठी खेळणार. मात्र एखादा खेळाडू आवडीचा नसेल तर तो जास्त वेळ भारतीय संघासाठी खेळू शतक नाही.
या खुलास्यानंतर आता असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, केएल राहुलचे संबंध चेतन शर्मांसोबत खूप चांगले आहेत. त्यामुळे सतत फ्लॉप होऊनही त्याला भारतीय संघातून बाहेर केलं जात नाहीये.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.