Heath Streak Death News Fake: हिथ स्ट्रिकच्या निधनाची बातमी खोटी! क्रिकेटर मित्राने चॅटिंगच शेअर केली, वाचा काय आहे भानगड?

Heath Streak Death: हिथ स्ट्रिकच्या निधनाची बातमी खोटी असल्याचा दावा माजी खेळाडूने केला आहे.
Heath Streak news
Heath Streak news saam tv
Published On: 

Heath Streak Is Alive: 

झिम्बाब्वे संघाचे माजी कर्णधार हिथ स्ट्रिक यांच्या निधनाची बातमी समोर येताच क्रिकेट चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. त्यांच्या निधनाची बातमी खोटी असल्याचा दावा माजी क्रिकेटपटू हेनरी ओलंगा यांनी केला आहे. त्यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

Heath Streak news
Asia Cup 2023: राहुल, अय्यर नव्हे तर चौथ्या क्रमांकावर खेळणार 'हा' फलंदाज; कर्णधार रोहितने केला मोठा खुलासा

हेनरी ओलंगा यांनी ट्विट करत असा माहिती दिली होती की,हिथ स्ट्रिक यांनी जगाचा निरोप घेतला आहे. झिम्बाब्वेच्या दिग्गज क्रिकेटपटूच्या आत्म्याला शांती मिळो. त्यांच्यासोबत खेळणं सम्मानजनक बाब होती. आता त्यांनी हे ट्विट डिलीट करून असा दावा केला आहे की, हिथ स्ट्रिक जिंवत आहेत.

हेनरी ओलंगा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, हिथ स्ट्रिकच्या निधनाची बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरली. मी आत्ताच त्यांच्यासोबत संवाद साधला. तिसऱ्या पंचांनी त्यांना माघारी बोलवले आहे. तो खुल्या मनाचा माणुस आहे आणि पुर्णपणे जिवंत आहेत.' (Latest sports updates)

अशी राहिलीय कारकिर्द..

हिथ स्ट्रिक यांच्या नेतृत्वाखाली खेळताना झिम्बाब्वेने २१ पैकी ४ कसोटी सामने जिंकले आहेत. तर ११ कसोटी सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर ६८ वनडे सामन्यांमध्ये झिम्बाब्वे संघाचे नेतृत्व करताना त्यांनी १८ सामन्यांमध्ये संघाला विजय मिळवून दिला. तर ४७ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.

त्यांच्या फलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर कसोटी क्रिकेटमध्ये त्यांनी १९९० धावा केल्या आहेत. तर वनडे क्रिकेटमध्ये त्यांनी २९४३ धावा केल्या आहेत. तर वनडे क्रिकेटमध्ये गोलंदाजी करताना त्यांनी २९.८२ च्या सरासरीने २३९ गडी बाद केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.