पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर नेहमीच आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. मात्र यावेळी तो आपल्या वक्तव्यामुळे नव्हे, तर वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. शोएब अख्तर जगातील सर्वात खतरनाक प्लेइंग ११ निवडली आहे. या प्लेइंग ११ मध्ये त्याने भारताच्या ४ दिग्गजांना स्थान दिलं आहे.
शोएब अख्तरने आपल्या प्लेइंग ११ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवणाऱ्या खेळाडूंना स्थान दिलं आहे. मात्र आश्चर्यचकीत करणारी बाब अशी की, त्याने भारताचे दिग्गज फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना आपल्या प्लेइंग ११ मधून बाहेर ठेवलं आहे. यासह पाकिस्तानला १९९२ वनडे वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या इमरान खानलाही प्लेइंग ११ मधून बाहेर ठेवलं आहे.
शोएब अख्तरने आपल्या ऑल टाईम ग्रेट वनडे प्लेइंग ११ मध्ये ४ भारतीय खेळाडूंना स्थान दिलं आहे. ज्यात सचिन तेंडुलकर, युवराज सिंग, कपिल देव आणि एमएस धोनी यांची निवड केली आहे. शोएब अख्तरच्या मते, हे चारही खेळाडू भारतीय क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू आहेत.
शोएब अख्तरने आपल्या ऑल टाईम ग्रेट प्लेइंग ११ मध्ये सलामीला फलंदाजी करण्यासाठी वेस्टइंडीजचे दिग्गज फलंदाज गॉर्डन ग्रीनिज यांची निवड केली आहे. त्यांना साथ देण्यासाठी सलामीवीर फलंदाज म्हणून सचिन तेंडुलकरची निवड केली आहे. तसेच इंजमाम उल हकची तिसऱ्या क्रमांकावर तर सईद अनवरची चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी निवड केली आहे.
अख्तरने मध्यक्रमात फलंदाजी करण्यासाठी एकापेक्षा एक धाकड फलंदाजांची निवड केली आहे. ज्यात पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी एमएस धोनी, सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज अॅडम गिलख्रिस्टची निवड केली आहे. तर सातव्या क्रमांकावर त्याने भारताचा सर्वात अनुभवी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगची निवड केली आहे.
शोएब अख्तरने आपल्या प्लेइंग ११ मध्ये गोलंदाज म्हणून स्वत:सह वसीम अकरम, वकार युनुस आणि कपिल देव यांची निवड केली आहे. तर फिरकी गोलंदाज म्हणून त्याने फिरकी गोलंदाज शेन वॉर्नची निवड केली आहे. यासह शेन वॉर्नची कर्णधार म्हणून केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.