
भारतीय संघात एकापेक्षा एक धाकड खेळाडू आहेत. मात्र चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार हा प्रश्न अजूनही कायम आहे. गेल्या वर्षीपर्यंत श्रेयस अय्यर ही जबाबदारी योग्यरित्या पार पाडत होता. मात्र दुखापतीमुळे तो संघाबाहेर आहे.
त्याच्या जागी सूर्यकुमार यादवला देखील संधी दिली गेली होती. मात्र सूर्यकुमार यादवला या संधीचं सोनं करता आलं नाही. आता चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी माजी भारतीय क्रिकेटपटू सौरव गांगुली यांनी पर्याय सुचवला आहे.
वेस्टइंडीज संघाविरूद्ध पदार्पण करताना युवा फलंदाज तिलक वर्माने दमदार कामगिरी केली होती. डाव्या हाताच्या या फलंदाजाने अप्रतिम फलंदाजी करत सर्वांची मनं जिंकली होती. आता सौरव गांगुली यांना देखील असं वाटू लागलं आहे की, जर श्रेयस अय्यर वर्ल्डकपसाठी कमबॅक करू शकला नाही तर त्याच्या जागी तिलक वर्माला संधी दिली जाऊ शकते. (Latest sports updates)
तिलक वर्माबाबत बोलताना सौरव गांगुली म्हणाले की, 'तिलक वर्मा उत्कृष्ठ युवा खेळाडू आहे. त्याच्याकडे अनुभव नाही मात्र या गोष्टी फारशा महत्वाच्या नाहीत. मला तर यशस्वी जयस्वालला देखील वरच्या फळीत खेळताना पाहायचं आहे. त्याच्यात टॅलेंट आहे. तो न घाबरता तुफान फटकेबाजी करतो. त्यामुळे हा एक उत्कृष्ठ संघ आहे.'
सौरव गांगुली यांच म्हणणं आहे की, भारतीय संघात अनुभवी आणि युवा खेळाडूंच मिश्रण असायला हवं. संघात यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा आणि ईशान किशन सारखे खेळाडू असायला हवेत जे मैदानावर जाऊन आक्रमक फलंदाजी करतात. राहुल द्रविड, रोहित शर्मा आणि निवडकर्त्यांकडे पर्याय उपलब्ध आहेत. त्यांना फक्त उत्तम ११ खेळाडूंची निवड करायची आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.