Sudhir Naik Passed Away: भारतीय संघासाठी वनडेत पहीला चाैकार मारणारे सुधीर नाईक यांचं निधन..

Sudhir Naik Demises: गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते
Sudhir naik
Sudhir naik Twitter
Published On

First Indian Cricketer To Hit Four In ODI For India: भारतीय संघाचे माजी सलामीवीर फलंदाज सुधीर नाईक यांचे ५ एप्रिल रोजी निधन झाले आहे. वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. काही दिवसांपूर्वी ते पडले होते, त्यामुळे त्यांच्या डोक्याला दुखापत झाली होती.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर ५ एप्रिल रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे.

Sudhir naik
IPL 2023 RR VS PBKS : पंजाबचे 'किंग्ज' पडले राजस्थानच्या 'रॉयल्स' वर भारी! रोमांचक सामन्यात ५ धावांनी विजयी

सुधीर नाईक यांच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी कसोटी आणि वनडे क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते.

त्यांना ३ कसोटी आणि २ वनडे सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली होती. त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये १४१ तर वनडेमध्ये ३८ धावा केल्या होत्या. (Latest sports updates)

तसेच वनडे क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी चौकार मारणारे ते पहिलेच क्रिकेटपटू होते. (Sudhir Naik Death)

Sudhir naik
IPL 2023 WATCH: गब्बरच्या रॉकेट शॉटने आपल्याच फलंदाजाला केलं दुखापतग्रस्त! शेवटी सोडावं लागलं मैदान - VIDEO

तर देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यांनी कर्णधार म्हणून जोरदार कामगिरी केली होती. १९७१ मध्ये झालेल्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत त्यांनी मुंबईचे नेतृत्व करताना मुंबईला जेतेपद मिळवून दिले होते. तसेच क्रिकेटला राम राम केल्यानंतर त्यांनी वानखडे स्टेडियमवर पीच क्युरेटरची भूमिका देखील पार पाडली होती.

सुधीर नाईक यांच्या निधनानंतर मुंबई क्रिकेट असोसिशनने देखील ट्विट करत त्यांना आदरांजली वाहिली आहे. तसेच मुंबईच्या क्रिकेटपटूंनी देखील करत त्यांना दुःख व्यक्त केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com