भारताचे सर्वात वयस्कर आणि माजी कर्णधार दत्ताजीराव गायकवाड (Dattajirao Gaekwad) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ९५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. दत्ताजीराव गायकवाड यांनी भारतीय क्रिकेटमध्ये मोलाचे योगदान दिले.
ते भारताचे माजी क्रिकेटपटू आणि माजी प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांचे वडील होते. गेल्या १२ दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मंगळवारी(१३ फेब्रुवारी) त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे.
दत्ताजीराव गायकवाड यांच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी १९५२ ते १९६१ दरम्यान भारतीय संघासाठी ११ कसोटी सामने खेळले. १९५९ मध्ये भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असताना त्यांना भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. १९५२ मध्ये त्यांनी भारतीय संघासाठी पदार्पण केलं. तर १९६१ मध्ये ते चेन्नईच्या मैदानावर आपला शेवटचा कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरले होते. (Cricket news in marathi)
भारताचे सर्वात वयस्कर खेळाडू..
दत्ताजीराव गायकवाड यांनी रणजी ट्रॉफी स्पर्धेत बडोदा संघाचं प्रतिनिधित्व केलं. ते १९४७ पासून ते १९६१ पर्यंत बडोदा संघासाठी क्रिकेट खेळले. यादरम्यान त्यांनी ४७.५६ च्या सरासरीने ३१३९ धावा केल्या. यात १४ शतकांचा समावेश आहे.
तसेच नाबाद २४९ धावा ही त्यांची सर्वोत्तम खेळी आहे. ही खेळी त्यांनी १९५९-६० च्या रणजी हंगामात महाराष्ट्र संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात केली होती. २०१६ मध्ये ते भारताचे सर्वात वयस्कर खेळाडू ठरले होते. यापूर्वी दिपक शोधने हे भारताचे सर्वात वयस्कर क्रिकेटपटू होते. त्यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले होते.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.