FIH Pro League: जुगराज सिंगची हॅटट्रीक; टीम इंडियाची दक्षिण आफ्रिकेवर मात

या सामन्यात भारतीय संघास तब्बल १२ पेनल्टी कॉर्नर मिळाले.
FIH Pro League
FIH Pro Leaguesaam tv
Published On

दक्षिण आफ्रिका : भारतीय संघातील जुगराज सिंगने (Jugraj Singh) त्याचा दुसरा आंतरराष्ट्रीय सामना खेळताना हॅटट्रिक साधत FIH प्रो लीग हॉकीत (FIH Pro League Hockey) यजमान दक्षिण आफ्रिकेचा पराभव करण्यात सिंहाचा वाटा उचलला. या स्पर्धेत टीम इंडियाने सलग दूसरा विजय नाेंदविला आहे. बुधवारी रात्री झालेल्या सामन्यान टीम इंडियाने (India) दक्षिण आफ्रिका (South Africa) संघास १०-०२ असे हरवलं. (India beat hosts South Africa 10-2 in the FIH Pro Hockey Pro League, on Wednesday.

जुगराजने चौथ्या, सहाव्या आणि 23 मिनिटांत तीन पेनल्टी कॉर्नरचे रूपांतर केले, तर गुरसाहिबजीत सिंग (Gursahibjit Singh) (24वे, 36वे) आणि दिलप्रीत सिंग (Dilpreet Singh) (25वे, 58वे) यांनी भारतासाठी प्रत्येकी दोन गोल केले. (FIH Pro Hockey Pro League Latest Marathi News)

या सामन्यात हरमनप्रीत सिंग (Harmanpreet Singh) , अभिषेक (Abhishek) आणि मनदीप सिंग (Mandeep Singh) यांनी भारतीय संघाकडून गाेल नाेंदविले. दक्षिण आफ्रिकेकडून डॅनियल बेल याने पेनल्टी कॉर्नरवर आणि रिचर्ड पॉट्झ यांनी उत्तम खेळ केला.

FIH Pro League
Amit Shah On Owaisi Attack: धाेका लक्षात घेता ओवेसींनी Z Security स्विकारावी : अमित शहा

मध्यंतरास भारतीय संघाकडे ०-८ असे आघाडी हाेती. दक्षिण आफ्रिकेने तिसऱ्या सत्रात भारतीय खेळाडूंना झुंज देत संघावर दोन गोल केले. चौथ्या आणि शेवटच्या सत्रात भारतीयांकडून अधिक बचावात्मक दृष्टीकोन दिसून आला कारण त्यांनी दक्षिण आफ्रिकेला चकित करण्यासाठी प्रति-हल्ल्यांवर अधिक अवलंबून राहून आपले लक्ष्य सुरक्षित ठेवण्यास प्राधान्य दिले. या स्पर्धेत शनिवारी भारतीय संघाची लढत फ्रान्सशी होईल.

Edited By : Siddharth Latkar

FIH Pro League
Nitesh Rane: जामीन देताना कोर्टाने घातल्या 'या' अटी; ४ तासापासून राणेंनी अन्न खालेलं नाही, आज हाेणार अँजिओग्राफी?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com