Women's Cricket: शेतकऱ्याच्या पोरीनं राखलं भारताचं नाक !

महिला संघाची अष्टपैलू खेळाडू स्नेह राणाने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाच्या नाकी नऊ आणले. पहिल्यांदा गोलंदाजीत आणि नंतर फलंदाजीत बहारदार कामगिरी करून राणाने सामना इंग्लंडच्या हातातून खेचून आणला.
Women's Cricket: शेतकऱ्याच्या पोरीनं राखलं भारताचं नाक !
Women's Cricket: शेतकऱ्याच्या पोरीनं राखलं भारताचं नाक ! Twitter/ @ICC
Published On

शेतकऱ्याची पोरगी जी आगीत जळून सोनं बनली आहे अशा मुलीवर स्लेजिंगचा (विरोधी संघाने दिलेल्या एक प्रकारच्या शिव्या) काय असा होणार. असेच काहीसे घडले भारताच्या महिला क्रिकेट संघातील (Indian Women's Cricket Team) खेळाडूबद्दल. महिला संघाची अष्टपैलू खेळाडू स्नेह राणाने (Sneh Rana) इंग्लंडविरुद्धच्या कसोटी (IND vs ENG Women's) सामन्यात इंग्लंड संघाच्या नाकी नऊ आणले. पहिल्यांदा गोलंदाजीत आणि नंतर फलंदाजीत बहारदार कामगिरी करून राणाने सामना इंग्लंडच्या हातातून खेचून आणला.

या सामन्यात भारत जिंकू शकला नाही, परंतु स्नेह राणाच्या कामगिरीमुळे भारतीय संघाने हारलेला सामना अर्निनीत राखला. प्रथम गोलंदाजी करताना स्नेह राणाने ४ बळी घेतले. त्यानंतर जेव्हा ती फलंदाजीची वेळ आली तेव्हा तिने पाच वर्षानंतर संघात स्थान मिळवले असले तरी तिने एक चांगली अष्टपैलू खेळाडू आहे हे सिद्ध करून दाखवले. पहिल्या डावात तिला फक्त दोन धावा करता आल्या परंतु दुसर्‍या डावात तिने चमत्कार केला.

ब्रिस्टलमध्ये खेळल्या गेलेल्या एकमेव कसोटी सामन्यात स्नेह राणाने १५४ चेंडूत १३ चौकारांच्या मदतीने ८० धावा केल्या आणि सामना अनिर्णित राखला. एक वेळ असे वाटत होते की भारत सामना काही धावांनी पराभूत होईल. परंतु, स्नेह राणा आणि तानिया भाटिया यांना हे मान्य नव्हते. फलंदाजी करतानाही इंग्लंडच्या खेळाडूंनी स्नेह राणा विरोधात जोरदार स्लेजिंग केली पण त्याचा तिच्या एकाग्रतेवर काही परिणाम नाही झाला.

मॅचनंतरच्या पत्रकार परिषदेत स्नेह राणाने स्लेजिंगच्या गोष्टीची कबुली दिली आणि ती म्हणाली "आम्हाला त्रास देणे हे त्याचे काम होते, आणि आपले लक्ष्य मिळवण्यासाठी त्यांनी बरेच काही केले. आम्हाला त्याची पर्वा नव्हती आम्ही प्रत्येक चेंडूनंतर एकमेकांशी बोलत होतो. यामुळे आम्हाला उत्तेजन मिळालं. आपल्याला टीमसाठी खेळायचं आहे, हा एकच संवाद आमच्यात होता."

Women's Cricket: शेतकऱ्याच्या पोरीनं राखलं भारताचं नाक !
Video: शमीच्या चौकाराने जेमीसनचे 'स्वप्न तुटले'

डेहराडूनमधील छोट्याशा सिनौला गावातील शेतकरी कुटुंबात स्नेह राणाचा जन्म झाला. २०१ ४ मध्ये तिने भारतीय संघात पदार्पण केले आणि देशासाठी खेळायला सुरुवात केली. पण त्यानंतर खराब कामगिरीमुळे आणि गुडघ्याच्या दुखापतीमुळे तिला संघाबाहेर जावे लागले. पण पुन्हा एकदा तिने देशाकडून खेळण्याचा निर्णय घेतला आणि प्रशिक्षण चालू ठेवले. देशासाठी पहिली कसोटी खेळण्याच्या काही महिन्यापूर्वी तिच्या वडिलांचे निधन झाले होते, परंतु त्यानेही स्नेह खचली नाही.

Edited By : Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com