Video: शमीच्या चौकाराने जेमीसनचे 'स्वप्न तुटले'

विश्व अजिंक्यपदासाठी अंतिम सामन्यात भारताचा पहिला डाव 217 धावांवर संपुष्टात आला. किवींचा वेगवान गोलंदाज काइल जेमीसनने भारताचा डाव उद्धस्त करण्यात मोठी भूमिका निभावला आहे.
शमीच्या चौकाराने जेमीसनचे 'स्वप्न तुटले'
शमीच्या चौकाराने जेमीसनचे 'स्वप्न तुटले'Twitter/ @ICC

विश्व अजिंक्यपदाच्या अंतिम (WTC Finals) सामन्यात भारताचा पहिला डाव 217 धावांत संपुष्टात आला. किवींचा वेगवान गोलंदाज काइल जेमीसनने (Kyle Jamieson) भारताचा डाव उद्धस्त करण्यात मोठी भूमिका निभावली आहे. जेमीसनने बहरदार कामगिरी करत 31 धावांत 5 बळी घेतले. आपल्या गोलंदाजीदरम्यान त्याने रोहित शर्मा, विराट कोहली (Virat Kohli), ऋषभ पंत, ईशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराहला बाद केले. इतकेच नाही तर जेमीसन हॅटट्रिक घेण्याच्या अगदी जवळ आला असता, मोहम्मद शमीने या किवी गोलंदाजाचे स्वप्न मोडले. झालं असं की 92 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर इशांत शर्माला बाद करण्यात जेमीसनला यश आले, तर जसप्रीत बुमराहला पाचव्या चेंडूवर बाद केले आणि सलग दोन चेंडूंत दोन बळी घेण्यास यशस्वी ठरला. यानंतर मोहम्मद शमी फलंदाजीला आला.

जेमीसन शमीला बाद करून आपली हॅटट्रिक पूर्ण करू शकला असता. चाहत्यांना असे वाटले की जेमीसन हॅट्रीक करेल, परंतु शेवटच्या चेडूंवर शमीने शानदार कव्हर ड्राईव्ह खेळत चौकार ठोकला. अशाप्रकारे, शमीने जेमीसनचे हॅटट्रिकचे स्वप्न तोडले. त्याच वेळी, जेमीसन शमीकडे गेला आणि त्याला पाहण्यास सुरुवात केली आणि काहीतरी बोलताना दिसला. त्याच वेळी, जेमीसनचे बोलने ऐकून शमी देखील हसणे थांबवू शकला नाही. एकमेकांशी बोलत असताना दोन्ही खेळाडू हसत होते. या दोघांचाही हसणारा फोटो आयसीसीने सोशल मीडियावरही शेअर केला आहे.

शमीच्या चौकाराने जेमीसनचे 'स्वप्न तुटले'
WTC Final: सामना जर अनिर्णित राहिला तर काय? ICC नं दिलं उत्तर

रहाणेने भारताकडून 49 धावा केल्या तर विराट कोहली 44 धावा करुण बाद झाला. याशिवाय शुभमन गिलने 28 धावांची खेळी केली. भारताची शेवटची विकेट जडेजाच्या रुपाने पडली. रवींद्र जडेजा 53 चेंडूत 15 धावा करून ट्रेंट बाउल्टचा बळी ठरला. भारताच्या डावात अश्विनने 27 चेंडूत 22 धावा केल्या.

दुसरीकडे, किवी संघाच्या 2 विकेट पडल्या आहेत. कॉन्वेने पुन्हा एकदा शानदार फलंदाजी करत 54 धावा केल्या त्याला इशांत शर्माने बाद केले. तत्पूर्वी टॉम लॅथम अश्विनच्या फिरकीच्या जाळ्यात अडकला. दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी केली.

Edited By : Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com