Bodybuilder: प्रसिद्ध बॉडी बिल्डरचं वयाच्या ३० व्या वर्षी निधन; धक्कादायक कारण आलं समोर

Famous Bodybuilder Wang Kun : आठ वेळा चॅम्पियन आणि आयएफबीबी सदस्य असलेले प्रसिद्ध चिनी बॉडी बिल्डर वांग कुनचं ३० व्या वर्षी निधन झालंय. हृदयविकाराच्या आजाराने त्याचे निधन झाले. ज्यामुळे फिटनेस जगाला धक्का बसला.
Bodybuilder: प्रसिद्ध बॉडी बिल्डरचं वयाच्या ३० व्या वर्षी निधन; धक्कादायक कारण आलं समोर
Published On
Summary
  • प्रसिद्ध चिनी बॉडी बिल्डर वांग कुन यांचे वयाच्या ३० व्या वर्षी निधन.

  • हृदयविकारामुळे मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती.

  • सलग ८ वेळा बॉडी बिल्डिंग पुरस्कार जिंकले होते.

चीनच्या एका प्रसिद्ध बॉडी बिल्डर वांग कुनचं वयाच्या ३० व्या वर्षी निधन झालं. कमालीचं फिटनेस आणि ध्यान साधना करणाऱ्या बॉडी बिल्डरचं कमी वयात निधन झाल्यानं अनेकांना धक्का बसलाय. हाती आलेल्या माहितीनुसार, वांग कुनला हृदयविकार होता, त्याचकारणाने त्याचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.

चीनच्या अनहुई शरीरसौष्ठव संघटनेने त्यांच्या मृत्यूची पुष्टी केलीय. वांग कुन यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या जीवनशैलीबद्दल चर्चा सुरू झालीय. एका तपस्वी साधूसारखे जीवन जगत होते. जोमाने व्यायाम करत होते आणि अतिशय मध्यम आहार घेत होता.

वांग कुन हे एक खेळाडू होता, त्याने इंटरनेशनल फेडरेशन ऑफ बॉडी बिल्डिंग अँण्ड फिटनेस प्रोफेशनलचा सदस्य होता. बॉडी बिल्डिंगसाठी ही चीनमधील मोठी संस्था आहे. वांग कुनने सलग ८ वेळा बॉडी बिल्डिंग म्हणजेच शरीरसौष्ठवचा पुरस्कार जिंकलाय. हे पुरस्कार त्यांना चीनच्या बॉडी बिल्डिंग असोसिएशनकडून मिळाले होते.

त्याने अनेकवेळा नॅशनल बॉडी बिल्डिंगच्या चॅम्पियनशीपच्या स्पर्धेत भाग घेतला होता. तो दिवसातील बहुतेक वेळ व्यायाम करण्यात घालवत. आपल्या डाएट आणि ट्रेनिगसाठी ओळखले जात. चिकन खाणे आणि सूप पिणे हे त्यांच्या डाएटमध्ये होते.

Bodybuilder: प्रसिद्ध बॉडी बिल्डरचं वयाच्या ३० व्या वर्षी निधन; धक्कादायक कारण आलं समोर
Syed Mushtaq Ali Trophy: ऐन सामन्यात यशस्वी जैस्वालची तब्येत अचानक बिघडली, पिंपरी-चिंचवडमधील रुग्णालयात दाखल

अनेक मुलाखतीत वागं कुन यांनी आपल्या डाएट आणि धान्य साधनेविषयी सांगितलंय. तो एखाद्या बौद्ध भिक्षू सारखे जीवन जगत होते. आकर्षक आणि पिळदार शरीरयष्टी कायम राहण्यासाठी ते खूप जपून राहत होते. ते निवडक पदार्थांचे सेवन करत. वक्तशीरपणामुळे त्याची वेगळी ओळख निर्माण झाली होती. त्याने अनेक ठिकानी जिम सुरू केल्या आहेत. त्यामुळे त्याला मसल फॅक्टरी नावाने देखील ओळखलं जात. ही नवीन जिम चेन त्याच्यासाठी एक नवीन सुरुवात असेल आणि एक नवीन जग असेल, जे ते स्वतःच्या डोळ्यांनी पाहू शकेल,असं तो आपल्या एका मुलाखतीत म्हणाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com