Faf Du Plessis Statement: विराटचं शतक व्यर्थ! सामन्यानंतर फाफ डू प्लेसिसने सांगितलं पराभवाचं नेमकं कारण
Faf du plessis statement after defeat against rajasthan royals in rr vs rcb match amd2000twitter

Faf Du Plessis Statement: विराटचं शतक व्यर्थ! सामन्यानंतर फाफ डू प्लेसिसने सांगितलं पराभवाचं नेमकं कारण

Faf Du Plessis On Defeat:राजस्थान रॉयल्सं संघाने हे आव्हान सहज पूर्ण केलं आणि शानदार विजय मिळवला. दरम्यान सामन्यानंतर कर्णधार फाफ डू प्लेसिसने पराभवाचा नेमकं कारण सांगितलं आहे.

RR vs RCB, Faf Du Plessis Statement:

जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने शानदार विजय मिळवला. विराट कोहलीने शतकी खेळी करूनही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून विराट कोहलीने ७२ चेंडूत ११३ धावांची खेळी केली.

या खेळीदरम्यान त्याने १२ चौकार आणि ४ षटकार मारले. विराट कोहलीच्या शतकी खेळीच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने २० षटक अखेर ३ गडी बाद १८३ धावांपर्यंत मजल मारली. मात्र राजस्थान रॉयल्सं संघाने हे आव्हान सहज पूर्ण केलं आणि शानदार विजय मिळवला. दरम्यान सामन्यानंतर कर्णधार फाफ डू प्लेसिसने पराभवाचा नेमकं कारण सांगितलं आहे.

फाफ डू प्लेसिसने सांगितलं पराभवाचं कारण..

राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध झालेल्या पराभवानंतर बोलताना फाफ डू प्लेसिस म्हणाला की, ' आम्हाला वाटलं होतं, १९० धावा खुप आहेत. जेव्हा मी आणि विराट फलंदाजी करत होतो त्यावेळी आम्हाला असं वाटलं होतं की, १९० धावा खूप होतील. आम्ही १०-१५ धावा मागे राहिलो.'

तसेच तो पुढे म्हणाला की, ' विराट शानदार फलंदाजी करत होता. विराट किंवा ग्रीननंतर डीके फलंदाजीला येणार होता. आम्ही आणखी धावा करू शकलो असतो. आम्ही तसा प्रयत्नही केला. त्यानंतर फिरकी गोलंदाजांचा चेंडू बॅटवर येत होता. मैदानावर दवाचं प्रमाण वाढलं. त्यामुळे खेळपट्टी फलंदाजांसाठी आणखी फायदेशीर झाली.' (Cricket news in marathi)

Faf Du Plessis Statement: विराटचं शतक व्यर्थ! सामन्यानंतर फाफ डू प्लेसिसने सांगितलं पराभवाचं नेमकं कारण
RR vs RCB,IPL 2024: RCB चं नेमकं चुकलं तरी कुठं? ही आहेत पराभवाची ३ मोठी कारणं

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, राजस्थान रॉयल्स संघाने हा सामना जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या विराट कोहलीने ११३ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने २० षटक अखेर १८३ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्स संघाकडून जोस बटलरने १ धावेची गरज असताना षटकार मारला आणि आपलं शतक पूर्ण करत संघाला विजय मिळवून दिला.

Faf Du Plessis Statement: विराटचं शतक व्यर्थ! सामन्यानंतर फाफ डू प्लेसिसने सांगितलं पराभवाचं नेमकं कारण
IPL 2024: आयपीएल स्पर्धेत मोठ्या फरकाने पराभूत होणारे संघ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com