Ben Stokes Comeback: वर्ल्डकपसाठी इंग्लंडचा दिग्गज निवृत्तीतून घेणार यू-टर्न! CSK ला मोठा धक्का बसण्याची शक्यता

World Cup 2023: वर्ल्डकप खेळण्यासाठी इंग्लंडचा दिग्गज खेळाडू निवृत्तीतून यू-टर्न घेणार आहे.
ben stokes with england cricket team
ben stokes with england cricket team saam tv
Published On: 

Ben Stokes Comeback In ODI Cricket: इंग्लंडचा कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्स याने गेल्या वर्षी वनडे क्रिकेटला राम राम ठोकण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता तो आपला निर्णय मागे घेऊ शकतो.

यावर्षी भारतात वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेसाठी तो पुन्हा एकदा इंग्लंडच्या वनडे संघातून खेळताना दिसून येऊ शकतो.

माध्यमातील वृत्तानुसार तो गतविजेत्या इंग्लंडला पुन्हा एकदा चॅम्पियन बनवण्यासाठी आपला निर्णय मागे घेण्याची शक्यता आहे.

ben stokes with england cricket team
IND VS WI 5th T20I: मास्टरमाईंड शेफर्ड! सूर्या अन् संजूला बाद करण्यासाठी असा रचला सापळा; सामन्यानंतर सांगितला काय होता प्लान

इंग्लंडसाठी आनंदाची तर चेन्नईसाठी वाईट बातमी..

बेन स्टोक्सचं कमबॅक ही इंग्लंड संघासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. मात्र त्याच्या कमबॅकमुळे चेन्नई सुपर किंग्ज संघाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. असं म्हटलं जात आहे की, जर बेन स्टोक्स इंग्लंड संघासाठी कमबॅक करणार असेल तर तो आगामी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेसाठी आयपीएल स्पर्धेतून माघार घेऊ शकतो.

जर त्याने आयपीएल स्पर्धेतून माघार घेतली तर हा चेन्नई सुपर किंग्जसाठी मोठा धक्का असेल. आयपीएल २०२३ स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात चेन्नई सुपर किंग्जने त्याच्यावर मोठी बोली लावली आहे. (Latest sports updates)

ben stokes with england cricket team
Venkatesh Prasad Statement: 'मुर्खासारखे विधाने करणं बंद करा अन्..', राहुल द्रविड अन् कॅप्टन पंड्यावर माजी क्रिकेटपटू जोरदार भडकले

तर असे देखील म्हटले जात आहे की,बेन स्टोक्स इंग्लंडसाठी अष्टपैलू खेळाडू म्हणून नव्हे तर फलंदाज म्हणून मैदानात उतरणार आहे. आगामी वनडे वर्ल्डकप स्पर्धेत तो मध्यक्रमात फलंदाजी करताना दिसून येऊ शकतो.

या स्पर्धेत तो गोलंदाजी करताना दिसून येणार नाही. कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्याने गेल्या वर्षी वनडे आणि टी -२० फॉरमॅटला राम राम ठोकला होता.

मात्र त्याच्या या निर्णयामुळे तो पुन्हा एकदा इंग्लंड संघासाठी खेळताना दिसून येणार आहे. इंग्लंडला २०१९ वर्ल्डकप जिकूंन देण्यात बेन स्टोक्सने मोलाची भुमिका बजावली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.