ENG vs IND: जड्डू-साई सुदर्शनच्या एकीनं घेतली जेमीची विकेट; सीमेवर झेल घेत लुटली मैफिल

ENG vs IND: जड्डू-साई सुदर्शन यांच्यात कमालीचा ताळमेळमुळे जेमी स्मिथचा खेळ खल्लास झाला. सोशल मीडिया या कॅचचा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे.
ENG vs IND: जड्डू-साई सुदर्शनच्या एकीनं घेतली जेमीची विकेट; सीमेवर झेल घेत लुटली मैफिल
Published On

इंग्लंड-भारत यांच्यातील हेडिंग्लेच्या मैदानातील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाच्या खेळाडूंनी फलंदाजी जबरदस्त केली पण क्षेत्ररक्षणात मात्र निराश केले. यशस्वी जैस्वाल या सर्वाधिक कॅच सोडल्याचे पाहायला मिळाले. झेलची संधी गमावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रवींद्र जडेजाचाही समावेश होता. एका बाजूला भारतीय खेळाडूंच्या खराब क्षेत्ररक्षणाची चर्चा रंगत आहे. तिसऱ्या दिवसातील खेळातील दुसऱ्या सत्रात जड्डू आणि साई सुदर्शन यांच्या रिले कॅचने भारतीय संघाला दिलासा दिला. त्यासह अनेकांना मंत्रमुग्ध केलं.

प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर इंग्लंडच्या जेमी स्मिथ ४० धावांवर झेलबाद झाला. या झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. इंग्लंडच्या संघाला उत्तम स्थितीत नेण्यात जेमी स्मिथची भूमिका मोठी आहे. संघाला एका चांगल्या स्थितीत नेण्यासाठी जेमी स्मिथनं हॅरी ब्रुकला उत्तम साथ देत अप्रतिम खेळी केली. डावातील तिसऱ्या दिवसाच्या खेळात बेन स्टोक्स स्वस्तात तंबूत परतल्यावर मैदानात जेम स्मिथनं कमालीचा खेळ दाखवला. पण तो प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला.

जेमी स्मिथ अर्धशतकाच्या दिशेनं वाटचाल करत होता. प्रसिद्ध कृष्णानं टाकलेल्या आखूड टप्प्याच्या चेंडूवर जेम स्मिथनं पुल शॉट खेळत चौकार मारण्याचा प्रयत्न केला. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं हवेत मारलेला हा फटका चौकार देणार असं वाटतं होतं. पण रवींद्र जडेजाने त्याचा हा प्रयत्न हाणून पाडला. आणि सीमारेषेवर कमालीच्या क्षेत्ररक्षणाचा नजराणा दाखवला. साई सुदर्शनसह उत्तम रिले कॅच घेत त्यांनी जेमी स्मिथला मैेदानाबाहेरचा रस्ता दाखवला.

ENG vs IND: जड्डू-साई सुदर्शनच्या एकीनं घेतली जेमीची विकेट; सीमेवर झेल घेत लुटली मैफिल
Rishabh Pant : सूजवलं रे याने एकाच जागी मारून-मारून ; स्टम्प माईकमध्ये रिषभ पंतचे 'ते' शब्द कैद

क्रिकेटच्या नियमात वेळोवेळी बदल होत असतात. नुकतेच सीमारेषेवरील झेल संदर्भातील नियमात मोठा बदल करण्यात आलाय. नव्या नियमानुसार, फक्त झेल पूर्ण करतानाच नव्हे तर सीमारेषेबाहेर जाणारा चेंडूला हाताचा स्पर्श होईल त्यावेळी खेळाडूचा सीमारेषेच्या आत असला पाहिजे. याचा अर्थ हवेत उडी मारून चेंडू मैदानात फेकला गेला तर तो झेल मानला जाणार नाही. हो नियम पाळत दोघांनी जेमीचा खेळ खल्लास केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com