Electra Stumps: क्रिकेटमध्ये नव्या युगाच्या स्टंप्सची एंट्री; Stumps सांगणार चौकार का षटकार

Electra Stumps: या स्टम्प्सला इलेक्ट्रा स्टंप्स नाव देण्यात आले आहे. या स्टंप्सचं वैशिष्ट्ये म्हणजे फलंदाजाने चौकार किंवा षटकार मारला तर या स्टंप्सवर लाईट लागतील.
Electra Stumps
Electra StumpsX
Published On

Electra Stumps BBL-2023 :

क्रिकेटमध्ये नवीन युगाचे नवीन स्टम्प्स दाखल झाले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या टी२० लीग 'बिग बॅश लीग' (BBL-2023) मध्ये हे नवीन स्टम्प्स दिसले. या स्टंप्सला इलेक्ट्रा स्टंप्स नाव देण्यात आले आहे. या स्टंप्सचं वैशिष्ट्ये म्हणजे फलंदाजाने चौकार किंवा षटकार मारला तर या स्टंप्सवर लाईट लागतील. विशेष गोलंदाजाने नो बॉल टाकला तरील यावरील लाइट लागतील. या स्टंप्सला वेगवेगळे लाईट लावण्यात आली आहेत. (Latest News)

दरम्यान याआधी हे स्टम्प्स महिला बिग बॅश लीग (WBBL) मध्ये वापरले गेले आहेत. आता हे स्टप्म्स पुरुषांच्या सामन्यात वापरले जाणार आहेत. बिग बॅश लीगच्या सामन्यापूर्वी मार्क वॉ आणि मायकेल वॉन यांनी या स्टंप्सविषयी संपूर्ण माहिती दिली. हे स्टंप्स महिलांच्या बिग बॅशमध्ये वापरले गेलेत. परंतु पुरुषांच्या क्रिकेट स्पर्धेत त्यांचा वापर होण्याची ही पहिलीच वेळ आहे. यानंतर मार्क वॉने या स्टंपची वैशिष्ट्ये सांगितली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विकेट: कोणताही खेळाडू बाद झाला तरी तो कोणत्याही मार्गाने आऊट झाला तरी हे स्टंप्सवर लाल लाईट लागतील.

चौकार : जर फलंदाजाने फटका मारला आणि चेंडू सीमेरेषेला लागला तर स्टंप्समध्ये लावण्यात आलेली वेगवेळी लाईट्स लागतील.

षटकार : जर फलंदाजाने षटकार मारला तर स्टंप्समध्ये लावण्यात आलेले लाईट्स वेगवेगळे रंगात चमकतील.

नो बॉल - जर अंपायरने नो बॉल दिला तर स्टंप्सवर लाल आणि पांढरे लाईट्स लागतील.

षटकांदरम्यान: एक षटक संपलं आणि पुढील षटक सुरू होईपर्यंत स्टंप्समध्ये जांभळे आणि निळे दिवे चमकतील.

Electra Stumps
Virat Kohli: कसोटी मालिकेआधी टीम इंडियाला मोठा धक्का; विराट कोहली भारतात परतला, काय आहे कारण?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com