David Miller Catch: किलर मिलरचा 'सुपरमॅन' स्टाईल कॅच! तिलक वर्मा पाहतच राहिला - VIDEO

David Miller Catch Video, India vs South Africa 2nd T20I: भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील दुसऱ्या सामन्यात डेव्हिड मिलरने शानदार झेल घेतला. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
David Miller Catch: किलर मिलरचा 'सुपरमॅन' स्टाईल कॅच! तिलक वर्मा पाहतच राहिला - VIDEO
DAVID MILLERtwitter
Published On

IND vs SA 2nd T20I: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ४ टी -२० सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना सेंट जॉर्ज ओव्हलच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं.

मात्र भारतीय संघाला हवी तशी सुरुवात करता आली नव्हती. भारतीय संघाला सुरुवातीलाच ३ मोठे धक्के बसले. त्यानंतर तिलक वर्माने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला बाद करण्यासाठी डेव्हिड मिलरने अविश्वसनीय झेल घेतला. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

तर झाले असे की, भारतीय संघाकडून चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी तिलक वर्मा फलंदाजीला आला होता. त्याने आपल्या खेळीदरम्यान २० चेंडूत २० धावांची खेळी केली. दक्षिण आफ्रिकेकडून आठवे षटक टाकण्यासाठी कर्णधार एडेन मार्करम गोलंदाजीला आला.

या षटकातील शेवटच्या चेंडूवर तिलकने कव्हरच्या दिशेने शॉट मारला. मात्र चेंडू फार डेव्हिड मिलरच्या हातात गेला. मिलरने एका हाताने शानदार झेल घेतला. हा खेळ पाहून तिलक वर्मालाही आश्चर्याचा धक्का बसला.

David Miller Catch: किलर मिलरचा 'सुपरमॅन' स्टाईल कॅच! तिलक वर्मा पाहतच राहिला - VIDEO
IND vs SA: दुसऱ्या सामन्यासाठी सूर्याचा मास्टरप्लान! या ११ खेळाडूंसह उतरणार मैदानात

भारतीय संघाची फ्लॉप सुरुवात

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडेन मार्करमने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाला हवी तशी सुरुवात करता आली नाही.

गेल्या सामन्यातील शतकवीर संजू सॅमसन या डावात शून्यावर बाद होऊन माघारी परतला. संजू सॅमसन पाठोपाठ अभिषेक शर्मा ४ धावांवर तंबूत परतला. त्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव ४ धावांवर माघारी परतला.

David Miller Catch: किलर मिलरचा 'सुपरमॅन' स्टाईल कॅच! तिलक वर्मा पाहतच राहिला - VIDEO
IND vs SA: नॉर्मल वाटलोय का? Tilak Varmaचा कोएत्जीला स्टेडियमबाहेर षटकार - VIDEO

सुरुवातीला मोठे धक्के बसल्यानंतर अक्षर पटेलने भारतीय संघाचा डाव सांभाळला. त्याने सुरुवातीला तिलक वर्मा आणि त्यानंतर हार्दिक पंड्यासोबत मिळून डाव सांभाळला. शेवटी हार्दिक पंड्या ३९ धावांवर नाबाद राहिला. भारतीय संघाने २० षटक अखेर ६ गडी बाद १२४ धावांपर्यंत मजल मारली

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com