दिल्ली आणि पुणेच्या संघात झालेल्या कबड्डीचा सामना खूप रोमांचकारी झाला. दोन्ही संघानी एकमेकांना जोरदार टक्कर देत सामना बरोबरीत सोडवला. दोन्ही संघांनी ३०-३० पाईंट घेत सामना बरोबरीत सोडवला. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात पुणेरी पलटणने लवकर आघाडी घेत चांगली सुरुवात केली. दिल्लीनेही मागे न राहता जोरदार प्रत्युत्तर दिले. हाफ टाईमपर्यंत पुनरागमन करत दिल्लीने १५-९ अशी आघाडी घेतली. यानंतर पुणेरी पलटणने उत्तरार्धात दिल्लीला बाद करत आघाडीमधील ३ गुण कमी केली.(Latest News)
सामना दिल्लीच्या दिशेने जाणार असे वाटत असतानाच पुणेरी पलटणने जोरदार पुनरागमन करत सामन्यावर ताबा मिळवण्यास सुरुवात केली. खेळाच्या शेवटच्या पाच मिनिटांत अतिशय रोमांचक परिस्थिती पाहायला मिळाली आणि दोन्ही संघांमध्ये दोनपेक्षा जास्त गुणाचे अंतर होते. पुणेरी पलटणने शेवटच्या दोन चढाईत गुण मिळवत सामना बरोबरीत सोडवला. जयपूर पिंक पँथर्सनंतर प्लेऑफसाठी पात्र ठरणारा पुणेरी पलटण हा दुसरा संघ ठरला.
हा सामना इंदुर येथील त्यागराज स्टेडियमवर खेळला गेला. पलटण संघाचा मागील इतिहास पाहिला तर संघाने १६ सामन्यात १२ विजय मिळवले आहेत. प्रो कबड्डीच्या पाईंट टेबलमध्ये पुणे पलटण दुसऱ्या स्थानांनी आहे. मागील सामन्यात पुणे पलटणने तेलुगू टायटन्सचा ६०-२९ असा धुव्वा उडवला होता.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.