CSK vs GT 1st Qualifier : चेन्नई की गुजरात? फायनल कोण गाठणार? पिच कुणाला करेल मदत, पावसाचा अंदाज वाचा सविस्तर

CSK vs GT 1st Qualifier : सामन्यासाठी चेपॉकच्या पिचची कुणाला मदत मिळेल याबाबत जाणून घेऊया.
IPL 2023 Match 1 GT VS CSK
IPL 2023 Match 1 GT VS CSKTwitter

CSK vs GT, IPL 2023 1st Qualifier Match: आयपीएलच्या 16व्या मोसमातील पहिला क्वालिफायर सामना उद्या चिदंबरम स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स  यांच्यात हा पहिला सामान रंगणार आहे.

गतविजेत्या गुजरात IPL च्या सलग दोन हंगामात प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. चेन्नईचा संघ 16 वर्षांच्या आयपीएल इतिहासात 12 वेळा प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. दोन्ही संघ अंतिम फेरी गाठण्यासाठी प्रयत्नशील असतील. या सामन्यासाठी चेपॉकच्या पिचची कुणाला मदत मिळेल याबाबत जाणून घेऊया.

चेपॉक स्टेडियमचा पिच रिपोर्ट

चेपॉक स्टेडियमचं पिच फिरकीपटूंना अनुकूल आहे. लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघांनी या मोसमात चार वेळा विजय मिळवला असला, तरी सहसा प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी येथे अधिक सामने जिंकले आहेत. गुजरातकडे रशीद खान आणि चेन्नईकडे जाडेजा आणि मोईन अली असे चांगले फिरकीपटू आहेत. त्यामुळे आयपीएल 2023 च्या पहिल्या क्वालिफायरमध्ये दोन्ही संघ एकमेकांना कडवी लढत देतील असा अंदाज आहे. (Latest sports updates)

IPL 2023 Match 1 GT VS CSK
Sachin Tendulkar Tweet: गिलची तुफान फटकेबाजी पाहून मास्टर- ब्लास्टरही झाला खुश! ट्विट करत म्हणाला...

पावसाचा अंदाज

उद्याच्या चेन्नई आणि गुजरात यांच्यातील सामन्यात पावसाचा धोका नाही. हवामान खात्याच्या अहवालानुसार, मंगळवारी, 23 मे रोजी चेन्नईचे तापमान दिवसा 36 अंश सेल्सिअस आणि रात्री 29 अंश सेल्सिअसपर्यंत राहू शकते. दिवसा 5% आणि रात्री 6% पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सामन्यावर पावसाचा परिणाम होण्याची शक्यता कमी आहे. (IPL News)

IPL 2023 Match 1 GT VS CSK
IPL 2023 Playoffs Schedule: प्लेऑफचे ४ संघ ठरले! कधी आणि कुठे रंगणार सामने? पाहा संपूर्ण वेळापत्रक

टॉस जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करणार?

चेन्नई आणि गुजरातचा सामना लो स्कोअरिंग असू शकतो. या स्टेडियममध्ये मागील काही सामने लो स्कोअरिंग झाले आहेत. या मैदानात धावांचा पाठलाग करणे सोपे नाही. येथे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांच्या विजयाची शक्यता अधिक आहे. त्यामुळे टॉस जिंकणारा संघ या मैदानावर प्रथम फलंदाजी करण्यास प्राधान्य देऊ शकतो.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com