T20 World Cup 2024: अरे बापरे! सामन्यादरम्यान दोन स्टार खेळाडू भिडले, मैदानात हायव्होल्टेज ड्रामा; VIDEO समोर

Cricketer Tanzim Hasan Sakib Rohit Paudel Fight Video: बांग्लादेश विरुद्ध नेपाळ सामन्यादरम्यान दोन स्टार खेळाडूंमध्ये वाद झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. नेपाळचा कर्णधार रोहित पौडेल आणि बांग्लादेश संघाचा गोलंदाज तनजिम हसन शाकिब यांच्यात मैदानावर बाचाबाची झाली होती.
सामन्यादरम्यान दोन स्टार खेळाडू भिडले
Cricketer Tanzim Hasan Sakib Rohit Paudel FightSaam Tv

बांग्लादेश आणि नेपाळ यांच्यात टी २० विश्वचषक २०२४ चा ३७ वा सामना १६ जून रोजी खेळला गेला. या सामन्यात बांगलादेशी संघाने २१ धावांनी विजय मिळवला, तर नेपाळचा पराभव झाला. सामन्यादरम्यान दोन्ही संघ विजयासाठी मोठी कसरत करताना दिसले. दरम्यान, नेपाळचा कर्णधार रोहित पौडेल आणि विरोधी संघाचा वेगवान गोलंदाज तनजिम हसन शाकिब यांच्यात मैदानावर बाचाबाची झाल्याचं समोर आलंय.

व्हिडिओमध्ये दिसतंय की, रोहित पौडेल आणि तनझिम हसन शाकिब यांच्यात शाब्दिक वाद झालाय. दोघंही रागाच्या भरात एकमेकांशी बोलत होते. त्यामुळे मैदानावरील वातावरण काही काळासाठी चांगलंच तापलं (Cricketer Tanzim Hasan Sakib Rohit Paudel Fight Video) होतं. बांगलादेश आणि नेपाळच्या टी २० सामन्यादरम्यान हा हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला आहे. पंचांच्या मध्यस्थीने वातावरण शांत झाल्याचं दिसतंय.

आयसीसीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर या दोघांच्या भांडणाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दोन्ही खेळाडू मैदानाच्या मध्यभागी मोठ्या आवाजाक एकमेकांशी बोलताना दिसत (Bangladesh VS Nepal) आहेत. मात्र, प्रकरण आणखी चिघळण्याआधीच मैदानावरील पंचांनी हस्तक्षेप करून प्रकरण मिटवल्याचं समोर आलंय. त्यानंतर दोन्ही खेळाडू आपापल्या मार्गाने निघून गेल्याचं दिसत आहे.

सामन्यादरम्यान दोन स्टार खेळाडू भिडले
Pakistan Cricket Team: ICC मुळे पाकिस्तानचा संघ सुपर 8 मध्ये पोहचू शकला नाही,माजी कर्णधाराचा मोठा आरोप

याआधी नेपाळविरुद्धच्या सामन्यात तनजीम हसन शकीबची भन्नाट गोलंदाजी (T20 World Cup 2024) क्रिकेटप्रेमींना पाहायला मिळाली. या सामन्यात त्याने आपल्या संघासाठी एकूण ४ षटके टाकली होती. केवळ ७ धावांत ४ बळी घेतले होते. नेपाळविरुद्धच्या उत्कृष्ट गोलंदाजीसाठी हसन शकीबला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ म्हणून निवडण्यात आलं होतं. विरोधी संघाचा कर्णधार रोहित पौडेल या सामन्यात आपल्या संघासाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. तो केवळ सहा चेंडूंमध्ये एक धाव काढून बाद झाला (T20 World Cup 2024 Video) होता.

सामन्यादरम्यान दोन स्टार खेळाडू भिडले
New Zealand Cricket Team:न्यूझीलंडच्या सुमार कामगिरीनंतर दिग्गज खेळाडूची निवृत्ती? सामन्यानंतर केली मोठी घोषणा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com