IPL Legendary Players: आयपीएल २०२३ स्पर्धेला सुरुवात व्हायला अवघे तास शिल्लक राहिले आहेत. स्पर्धेतील पहिला सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांमध्ये पार पडणार आहे.
हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. या स्पर्धेत असे काही खेळाडू आहेत ज्यांचा हा आयपीएलचा शेवटचा हंगाम असू शकतो.
चला तर पाहूया कोण आहेत ते खेळाडू.
१) एमएस धोनी:
एमएस धोनी सध्या या स्पर्धेतील सर्वात वयोवृद्ध खेळाडू आहे. वयवर्ष ४१ असलेला एमएस धोनी आयपीएल २०२२ स्पर्धेत निवृत्ती जाहीर करेल असा अंदाज व्यक्त केला गेला होता. मात्र तो आगामी हंगामात देखील खेळताना दिसून येणार आहे.
या हंगामात देखील त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. हा त्याचा शेवटचा हंगाम असू शकतो. चेपॉकच्या मैदानावर तो चाहत्यांचे आभार मानून निवृत्त होऊ शकतो.
२) अमित मिश्रा:
अमित मिश्राने देखील वयाची चाळीशी ओलांडली आहे. गेल्या ४-५ हंगामात त्याची कामगिरी खालावली आहे. गेल्या हंगामातील ४ सामन्यांमध्ये केवळ ६ गडी बाद केले होते.
१५० पेक्षा अधिक सामने खेळण्याचा अनुभव असलेला यावेळी लखनऊ संघाकडून खेळताना दिसून येणार आहे. त्याची गेल्या काही वर्षातील कामगिरी पाहता हा त्याचा शेवटचा हंगाम असू शकतो. (Latest sports updates)
३)फाफ डू प्लेसिस
आयपीएल स्पर्धेत फाफ डू प्लेसिस रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे नेतृत्व करत आहे. मात्र गेल्या हंगामातील कामगिरी पाहिली तर त्याचा स्ट्राईक रेट कमी झाला आहे. २०२० मध्ये त्याने ४४९, २०२१ मध्ये ६३३ आणि २०२२ मध्ये ४६८ धावा केल्या होत्या. फाफ डू प्लेसिस आता ३८ वर्षांचा आहे. त्यामुळे तो कधीही या स्पर्धेला राम राम करू शकतो. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला पर्यायी कर्णधार शोधावा लागणार आहे.
४)वृद्धिमान साहा:
वय वर्ष ३८ असलेला वृद्धिमान साहाला फलंदाजी आणि यष्टिरक्षण करताना हवी तशी कामगिरी करता आली नाहीये. गतवर्षी झालेल्या स्पर्धेत त्याने यष्टीमागे केवळ २ स्टंपिंग केल्या आणि केवळ ११ कॅचेस पकडल्या. गेल्या हंगामात त्याने फलंदाजी करताना केवळ ३१७ धावा केल्या होत्या. तर २०२१ मध्ये केवळ १३१ धावा केल्या होत्या.
५) दिनेश कार्तिक :
टी -२० वर्ल्ड कप स्पर्धा झाल्यानंतर दिनेश कार्तिक भारतीय संघातून बाहेर झाला होता. त्यानंतर तो समालोचन करताना दिसून आला होता. वय वर्ष ३८ पूर्ण असलेल्या दिनेश कार्तिकचा हा शेवटचा हंगाम असू शकतो. क्रिकेट नंतर तो या स्पर्धेत समालोचन करताना दिसून येऊ शकतो. मात्र यावेळी तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला आपले पहिले जेतेपद मिळवून देण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.