Rohit Sharma IPL Records: हिटमॅन रोहित आहे IPL चा 'झिरो नंबर १' तब्बल इतक्यांदा झालाय शून्यावर बाद..

Most Ducks in IPL: या स्पर्धेत सर्वाधिक वेळेस शून्यावर बाद होऊन माघारी परतण्याची नोंद ही रोहित शर्माच्या नावे आहे
most ducks in ipl
most ducks in ipl Twitter/IPL
Published On

Rohit Sharma IPL Records: मुंबई इंडियन्स हा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. या संघाला यश मिळवून देण्यात कर्णधार रोहित शर्माने मोलाची भूमिका बजावली आहे.

नेतृत्वासह त्याने उत्तम फलंदाजी देखील केली आहे. या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप ५ फलंदाजांच्या यादीत त्याचा समावेश आहे.

दरम्यान त्याच्या नावे एका नको असलेल्या विक्रमाची देखील नोंद आहे.

most ducks in ipl
Fight In Cricket: लाईव्ह सामन्यात तुफान राडा! बाद होताच फलंदाजाने रागात फेकली बॅट अन् हेल्मेटच तोडलं -VIDEO

हिटमॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने आयपीएल स्पर्धेत धावांचा पाऊस पाडला आहे. मात्र हंगामातील सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये तो जर फ्लॉप ठरला, तर संपूर्ण हंगामात त्याला चांगली कामगीरी करता येत नाही.

या स्पर्धेत सर्वाधिक वेळेस शून्यावर बाद होऊन माघारी परतण्याची नोंद ही रोहित शर्माच्या नावे आहे. रोहीत शर्मा हा आयपीएल स्पर्धेत २२२ वेळेस फलंदाजी करण्यासाठी आला आहे. यादरम्यान तो १४ वेळेस तो शून्यावर बाद होऊन माघारी परतला आहे.

रोहित शर्मा आणि मनदीप सिंग हे संयुकरित्या अव्वल स्थानी आहेत. (Latest sports updates)

most ducks in ipl
Match Fixing In Cricket : मॅच फिक्सिंगचा डाग काही जाईना! या १३ सामन्यांत झाली होती मॅच फिक्सिंग, खळबळजनक खुलासा

रोहित शर्माच्या नावे आयपीएल स्पर्धेत नकोशा विक्रमाची नोंद असली तरी देखील त्याचा सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत समावेश आहे. मुंबईला ५ वेळा चॅम्पियन बनवणाऱ्या रोहित शर्माने आतापर्यंत आयपीएल स्पर्धेतून एकूण १७८.५ कोटी इतकी कमाई केली आहे.

आगामी आयपीएल स्पर्धा येत्या ३१ मार्चपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेत कर्णधार रोहित शर्माकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. मुंबईचा पहिला सामना २ एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासोबत रंगणार आहे.

आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक वेळेस शून्यावर बाद होऊन माघारी परतणारे फलंदाज..

मनदीप सिंग -१४ वेळा

रोहित शर्मा - १४ वेळा

पियुष चावला- १३ वेळा

हरभजन सिंग -१३ वेळा

पार्थिव पटेल -१३ वेळा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com