

IND VS AUS WTC FINAL 2023: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना सुरु आहे. या सामन्यात भारतीय ऑस्ट्रेलिया संघाने प्रथम फलंदाजी करताना ४६९ धावा केल्या होत्या.
या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला २९६ धावा केल्या आहेत. भारतीय संघाकडून अजिंक्य रहाणेने सर्वाधिक ८९ धावांची खेळी केली आहे.
तर शार्दूल ठाकूरने ५१ धावांची खेळी केली. दरम्यान अजिंक्य रहाणेला बाद करण्यासाठी कॅमेरून ग्रीनने भन्नाट झेल टिपला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
तर झाले असे की, दुसऱ्या डावाची सुरुवात झाली तेव्हा अजिंक्य रहाणे ८९ धावांवर नाबाद होता. त्यावेळी पॅट कमिन्स गोलंदाजी करण्यासाठी आला होता. पॅट कमिन्सने ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला.
या चेंडूवर अजिंक्य रहाणेने शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा हा प्रयत्न फसला. चेंडू बॅटची कडा घेत स्लिपमध्ये असलेल्या कॅमेरून ग्रीनच्या हातात गेला. मात्र हा झेल सोपा मुळीच नव्हता. त्याने उजव्या दिशेने डाइव्ह मारत एका हाताने झेल टिपला. या झेलवर नेटकरी कौतुकाचा वर्षाव करताना दिसून येत आहे. (Latest sports updates)
रहाणेचं शतक हुकलं..
भारतीय संघाला पहिल्या डावात मोठे धक्के बसले होते. रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा सारखे फलंदाज स्वस्तात माघारी परतले होते. त्यामुळे अजिंक्य रहाणेवर मोठी जबाबदारी होती. ही जबाबदारी त्याने योग्यरीत्या पार पाडली.
त्याने सुरुवातीला रविंद्र जडेजासोबत मिळून अर्धशतकी भागीदारी केली. त्यानंतर त्याने शार्दूल ठाकूरसोबत मिळून शतकी भागीदारी केली. त्याने या डावात १२९ चेंडूंचा सामना करत ८९ धावांची खेळी केली.
या खेळीदरम्यान त्याने ११ चौकार आणि १ षटकार मारला. त्याचे शतक अवघ्या ११ धावांनी हुकले. मात्र त्याच्या दमदार खेळीने भारतीय संघाने या सामन्यात दमदार कमबॅक केलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.