

ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमार ज्युनियरने ख्रिस्तियानो रोनाल्डोची वाट धरली आहे. १५ ऑगस्ट रोजी मोठी घोषणा करण्यात आली आहे. ब्राझीलचा हा स्टार खेळाडू आता सौदी अरेबियातील अल-हिलाल क्लब कडून खेळताना दिसून येणार आहे.
सौदी प्रो लीगच्या सोशल मीडिया अकाउंटवर याबाबत माहिती देण्यात आली आहे. २०१७ मध्ये पॅरीस सेंट जर्मनने त्याला २२२ मिलियन युरोची ऑफर देत संघात स्थान दिले होते.
आता अल-हिलाल संघासाठी खेळण्यासाठी त्याला २ वर्षांसाठी ९०० कोटींपेक्षा अधिकची रक्कम मिळणार आहे.
नेमार ज्युनियरने गेल्या ५ वर्षांपासून पॅरीस सेंट जर्मन संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. असा अंदाज व्यक्त केला गेला आहे की अल- हिलाल संघाकडून मिळणारी रक्कम २०२५ पर्यंत ४०० मिलियन डॉलरपर्यंत पोहचु शकते. आता तो सौदी प्रो- लीग स्पर्धेत तो ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या विरोधात खेळताना दिसून येणार आहे.
नेमार ज्युनियरची अल-हिलाल संघात जाणार असल्याची घोषणा होताच, पॅरीस सेंट जर्मन संघाकडून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. तसेच क्लबच्या प्रेसिडेंटने आभार देखील मानले आहेत. (Latest sports updates)
दिग्गज खेळाडूंची सौदीच्या दिशेने वाटचाल..
गेल्या काही वर्षांत फुटबॉल विश्वातील दिग्गज खेळाडूंनी सौदी वाट धरली आहे. यामागचं प्रमुख कारण म्हणजे ,या क्लबकडून खेळण्यासाठी खेळाडूंवर पैशांचा वर्षाव केला जातो. नेमार, ख्रिस्तियानो रोनाल्डो, सादियो माने, करीम बेंजेमा यांसह आणखी काही खेळाडूंनी सौदीची वाट धरली आहे. नेमार .ज्युनियरच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर त्याने १७३ सामन्यांमध्ये ११८ गोल केले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.