आयसीसी वनडे वर्ल्डकप स्पर्धा तोंडावर आली असताना ऑस्ट्रेलियन संघाला मोठा झटका बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज दुखापतीमुळे वर्ल्डकपमधून बाहेर झाला आहे. त्यामुळे ऐन मोक्याच्या क्षणी ऑस्ट्रेलियाला आपल्या संघात बदल करावा लागला आहे.
दरम्यान, या दुखापतग्रस्त गोलंदाजाच्या जागी ऑस्ट्रेलियाने जोरदार फॉर्ममध्ये असलेल्या फलंदाजाला संघात सामील करुन घेतलं आहे. विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी सर्वच संघांनी आपल्या 15 खेळाडूंची यादी जाहीर केली होती.
मात्र, संघात काही बदल करायचे असतील, तर त्यासाठी 28 सप्टेंबर शेवटची तारीख होती. एकीकडे टीम इंडियाने शेवटच्या दिवशी रविचंद्रन आश्विनला संघात घेतलं असताना, दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने देखील मोक्याच्या क्षणी आपल्या संघात मोठा बदल केला.
विश्वचषक स्पर्धा तोंडावर असताना ऑस्ट्रेलियाचा वेगवाग गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेला. विशेष बाब म्हणजे या गोलंदाजाचे भारतीय मैदानावर चांगले आकडे होते. तसं पाहता वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलियाने जाहीर केलेल्या 15 खेळाडूंमध्ये सर्वच खेळाडू फिट होते. मात्र, त्यांच्या स्क्वॉडमधील डावखुरा फिरकीपटू एश्टन अँगर हा दुखापतग्रस्त होता.
अँगर पूर्णपणे फिट होईल, अशी ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाला अपेक्षा होती. मात्र, तो शेवटच्या दिवशीपर्यंत फिट झाला नाही. त्यामुळे ऐन मोक्याच्या क्षणी ऑस्ट्रेलियाला आपल्या संघात सक्तीने बदल करावा लागला. अँगरच्या जागी ऑस्ट्रेलियन संघाने टॉप ऑर्डर फलंदाज मार्नस लाबुशेन याला संघात सामील करुन घेतलं आहे.
मार्नस लाबुशेन याचा आधीच वर्ल्ड कप संघात समावेश करण्यात आला नव्हता. कॅमेरून ग्रीन दुखापतग्रस्त झाला आणि त्याच्या जागी त्याला संघात जागा मिळाली होती. दक्षिण आफ्रिका मालिकेत मार्नस लॅबुशेन अचानक बदली खेळाडू मैदानाता उतरला आणि हिरो झाला होता. त्याने नाबाद 80 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला होता.
दरम्यान, भारताविरूद्धच्या तिन्ही वन डे सामन्यामध्ये मार्नस लाबूशेन याने फार चांगली कामगिरी केली नव्हती. तिन्ही सामन्यांमध्ये त्याने 39, 27 आणि 72 अशा धावा केल्या होत्या. त्यामुळे आपली वर्ल्डकप संघात निवड होईल, याची पुसटही कल्पना लाबुशेनला नव्हती. मात्र, नशीबाचा साथ मिळाल्याने त्याची वर्ल्ड कप संघात निवड झाली आहे. मार्नस लाबुशेन याचा हा पहिला वन डे वर्ल्ड कप असणार आहे.
पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, अॅलेक्स कॅरी (विकेटकिपर), जोश इंग्लिस, सीन अॅबॉट, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लॅबुशेन, मिच मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा, मिचेल स्टार्क.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.