Musheer Khan: कानपूरहून निघताना भारतीय खेळाडूचा अपघात, पुढील सामन्याला मुकणार

Irani Cup 2024, Musheer Khan Accident: मुंबईचा युवा स्टार खेळाडू मुशीर खान रस्ता अपघातात गंभीर जखमी झाला आहे.
Musheer Khan: कानपूरहून निघताना भारतीय खेळाडूचा अपघात, पुढील सामन्याला मुकणार
ajinkya rahane with musheer khan
Published On

Musheer Khan News In Marathi: इराणी कप २०२४ आधीच मुंबई संघाला मोठा धक्का बसला आहे. मुंबई संघाचा युवा स्टार खेळाडू मुशीर खानचा रस्ता अपघात झाला आहे. या अपघातात तो गंभीर जखमी झाला आहे. माध्यमातील वृत्तानुसार, तो लखनऊला जात असताना हा अपघात झाला आहे. या अपघातात त्याला फ्रॅक्चर झाल्याचे म्हटले जात आहे. आगामी इराणी कप स्पर्धेसाठी तो आपल्या वडिलांसोबत लखनऊच्या दिशेने निघाला होता. मात्र रस्त्यातच त्याचा अपघात झाला. त्यामुळे तो आगामी इराणी कप स्पर्धेतून बाहेर पडू शकतो, असं म्हटलं जात आहे.

१ ऑक्टोबरपासून इराणी कप

इराणी कपला येत्या १ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. या सामन्यात मुंबई आणि रेस्ट ऑफ इंडिया हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना लखनऊच्या इकाना स्टेडियमवर पार पडणार आहे. या स्पर्धेत सरफराज खान आणि मुशीर खान दोघेही मुंबईकडून खेळण्यासाठी मैदानात उतरणार होते. सरफराज खानला बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे. मात्र तो इराणी कपमध्ये मुंबईकडून खेळणार आहे. मुशीर खान इराणी कप स्पर्धेसाटी आपल्या वडिलांसह लखनऊच्या दिशेने निघाला होता. त्यावेळी हा अपघात झाल्याचं म्हटलं जात आहे.

Musheer Khan: कानपूरहून निघताना भारतीय खेळाडूचा अपघात, पुढील सामन्याला मुकणार
IND vs BAN 2nd Test: दुसऱ्या दिवसाचा खेळही पावसामुळे रद्द होणार? वाचा कसं असेल हवामान?

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबई संघातील खेळाडू मुबंईहून लखनऊला गेले. मात्र मुशीर खान आपल्या संघासोबत लखनऊला गेला नव्हता. तो आपल्या वडिलांसह आझमगडहून लखनऊला जाणार होता. दरम्यान लखनऊला जात असतानाच हा अपघात झाला आहे. त्यामुळे त्याला आगामी इराणी कप स्पर्धेत मुंबईचं प्रतिनिधित्व करता येणार नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com