Shubman Gill Ruled Out: सलामीच्या लढतीतून शुबमन गिल बाहेर! रोहितसोबत कोण करणार डावाची सुरूवात?

India vs Australia, World Cup 2023: ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.
shubman gill
shubman gill saam tv news
Published On: 

India vs Australia, World Cup 2023:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत भारतीय संघाचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरूद्ध रंगणार आहे. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यापू्र्वी भारतीय संघाची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. शुबमन गिल आजारपणामुळे बाहेर पडला आहे.

या सामन्यापूर्वी असं म्हटलं जात होतं की, शुबमन गिल पू्र्णपणे फिट होऊन ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात खेळताना दिसून येऊ शकतो. मात्र स्टार स्पोर्ट्सने दिलेल्या वृ्त्तानूसार शुबमन गिल भारतीय संघासोबत स्टेडियममध्ये जाताना दिसून आलेला नाही.

शुक्रवारी शुबमन गिल आजारी असल्याची माहिती समोर आली होती. त्याची डेंग्यूची चाचणी पॉझिटीव्ह आली होती.

कोण करणार डावाची सुरूवात?

गेल्या काही वर्षांपासून शुबमन गिल आणि रोहित शर्मा या जोडीने भारतीय संघाला चांगली सुरूवात करून दिली आहे. मात्र आता महत्वाच्या सामन्यात डावाची सुरूवात कोण करणार असा प्रश्न कर्णधार रोहित शर्मासमोर उपस्थित झाला आहे.

या सामन्यात सलामीवीर फलंदाज म्हणून ईशान किशन किंवा केएल राहुलला संधी दिली जाऊ शकते.

या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघची प्लेइंग ११:

रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टिरक्ष

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com