gujarat titans
gujarat titanssaam tv news

IPL 2024: आयपीएल २०२४ स्पर्धेपूर्वीच गुजरातला मोठा धक्का! संघातील प्रमुख खेळाडूची स्पर्धेतून माघार

Rashid Khan Injury: आयपीएल २०२४ स्पर्धेपूर्वीच गुजरात टायटन्सला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
Published on

IPL 2024 Gujarat Titans:

आयपीएल २०२४ स्पर्धेला सुरुवात व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. येत्या मार्च महिन्यात ही स्पर्धा रंगणार आहे. दरम्यान ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच गुजरात टायटन्स संघाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

संघातील प्रमुख गोलंदाज राशिद खानने पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. तो गेल्या महिन्यांपासून दुखापतग्रस्त होता. त्याच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया झाली असून तो सध्या रिहॅब करतोय. त्यामुळे तो आगामी आयपीएल हंगामापर्यंत फिट होणार का? फिट झाला तरी तो आगामी हंगाम खेळणार का? असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

राशिद खान हा गुजरात टायटन्स संघाचा हुकमी एक्का आहे. २०२२ मध्ये गुजरातला जेतेपद मिळवून देण्यात राशिद खानने मोलाची भूमिका बजावली होती. तो जर संघातून बाहेर झाला तर हा गुजरात टायटन्ससाठी मोठा धक्का असेल. (Cricket news in marathi)

gujarat titans
IND vs ENG,1st Test: बेन स्टोक्सने पहिल्याच दिवशी केलेली ही मोठी चूक इंग्लंडला महागात पडणार

काय म्हणाला हेड कोच?

अफगाणिस्तानचा हेड कोच जोनाथन ट्रॉटने म्हटलं की, ' आम्ही राशिद खानच्या कमबॅकसाठी मुळीच घाई करणार नाही. तो आमच्या संघातील प्रमुख खेळाडू आहे. तो पूर्णपणे फिट आहे की नाही याची शास्वती मिळाल्यानंतर आम्ही पुढील निर्णय घेऊ. तो पूर्णपणे फिट झाल्यानंतर लवकरच मैदानावर खेळताना दिसून येईल. त्यापूर्वी राशिद खान डॉक्टरांची भेट घेणार आहे. तो लवकरच मैदानावर कमबॅक करेल,मात्र आम्ही घाई करणार नाही.'

gujarat titans
IND vs ENG 1st Test 1st Inning: बॅझबॉलवर टीम इंडियाचे फिरकी गोलंदाज पडले भारी! इंग्लंडचा पहिला डाव २४६ वर संपुष्टात

हार्दिक पंड्या गेल्यानंतर गुजरातला मोठा धक्का बसला आहे. आता राशिद खान जर स्पर्धेतून बाहेर झाला तर हा गुजरातसाठी दुसरा मोठा धक्का असेल. नुकताच भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतही त्याला स्थान देण्यात आलं नव्हतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com