अफगाणिस्तानमध्ये वर्ल्डकप स्पर्धेत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. रविवारी झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानने गतविजेत्या इंग्लंडवर ६९ धावांनी विजय मिळवला. या विजयानंतर क्रिकेटपटू राशिद खान भावुक झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
अफगाणिस्तानमध्ये तीन हजारांहून अधिक लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. हा विजय त्या लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणेल, असं वक्तव्य राशिद खानने केलं आहे.
हा सामना झाल्यानंतर राशिद खान म्हणाला की, 'हा आमच्यासाठी खूप मोठा विजय आहे. अशा विजयामुळे आम्हाला आत्मविश्वास मिळतो की, आम्ही कुठल्याही संघाला हरवू शकतो.' या सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना २८४ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव अवघ्या २१५ धावांवर संपुष्टात आला.
तसेच तो पुढे म्हणाला की,' क्रिकेट अशी गोष्ट आहे जी,अफगाणिस्तानमधील लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवते. इंग्लंडविरूद्ध सामना जिंकणं ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. नुकताच अफगाणिस्तानात भुकंप आला होता. ज्यात तीन हजारांहून अधिक लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. अनेक घरे नष्ट झाली आहेत. त्यामुळे हा विजय त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवेल आणि दु:ख कमी करेल.'
अफगाणिस्तानात भुकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भुकंपामुळे हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. रविवारी अफगाणिस्तानच्या पश्चिम भागात ६.३ रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप झाला. अफगाणिस्तानचा अष्टपैलू खेळाडू मुजीब उर रहमानने आपला सामनवीराचा पुरस्कार देशवासियांना समर्पित केला आहे. (Latest sports updates)
या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, या सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना २८४ धावांचा डोंगर उभारला होता. अफगाणिस्तानकडून प्रथम फलंदाजी करताना रहमानुल्लाह गुरबाजने सर्वाधिक ८० धावांची खेळी केली. तर या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव अवघ्या २१५ धावांवर संपुष्टात आला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.